मुंबई: भाजपचे नेते आशिष शेलार यांनी आदित्य ठाकरे आणि कुटुंबीय यांच्यावर टीका केली. यावर आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. (Maharashtra politics State Government XX baug Sanjay Raut throng said you are like a pig)
आशिष शेलार यांच्या टीकेबाबत संजय राऊत विचारण्यात आलं. त्यावर त्यांनी कोण आशिष शेलार? असा सवाल केला. अजित पवारांवर बोलता का? पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 70 हजार कोटींचा आरोप केला. हसन मुश्रीफ, राहुल शेवाळे, प्रफुल्ल पटेल, प्रताप सरनाईक, भावना गवळी यांच्याविषयी का बोलत नाही? तुमची चड्डी सुटली आहे. लोंबते आहे. नाडी सुटली ना? इक्बाल मिर्चीवर बोलता का? आमचा कचरा तुमच्या डंपिंगमध्ये घेतला ना?
तुम्ही डुकरासारखं त्यात लोळत आहात ना? हा कचरा तुम्ही साफ करता का? मी फक्त आशिष शेलारांना बोलत नाही. भाजपच्या सर्व नेत्यांना बोलतोय. तो मुलुंडचा नागडा पोपटलालही बोलणार आहे का? तुमच्याकडचा कचरा जेसीबी लावून साफ करा. तुम्ही डरपोक आहात, अशी टीका करतानाच सध्याचं भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गट यांचं सरकार हे हा या महाराष्ट्रातील राजकारणातील XXबगिचा आहे. नामदेव ढसाळांचा कविता संग्रह होता XXबगिचा. हा XX बगिचा आपल्याला महाराष्ट्रात दिसतो, असा हल्लाच संजय राऊत यांनी चढवला आहे.
तो निधी खासगी कामासाठी
मुख्यमंत्री सहाय्यता निधीवरूनही त्यांनी टीका केली. आता मुख्यमंत्री सहाय्यता निधीपेक्षा आमदार, खासदार सहाय्यता निधी मुख्यमंत्र्यांनी सुरू केला आहे. त्यात ठेकेदारांकडून पैसे येत आहेत. मुख्यमंत्री सहाय्यता निधीचे पैसे आमदार, खासदार निधीकडे वळवले जातात. खोक्यातून भरून हा सहाय्यता निधी आमदार, खासदारांच्या घरी पोहोचवला जात आहे. सरकार टिकवण्यासाठी हा खटाटोप आहे.
ज्या मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी आरोग्यविषयक मदत मिळत होती. ती आता मिळत नाही. ज्यांना सहाय्यता निधीला द्यायला असतात ते पैसे खासगी कामासाठी वळवले जातात. उद्धव ठाकरेंनी तो फंड मजबूत केला. पीएम केअर फंडासारखं केलं नाही. कुणी दिला कधी दिला हिशोब नाही. उद्धव ठाकरेंनी तसं केलं नाही, असं राऊत म्हणाले.
राज्याच्या कॅबिनेटमध्ये गँगवार सुरू आहे. मी आधीच सांगितलं होतं. हे गँगवार सुरू राहील. जोपर्यंत मोठी दुर्घटना होणार नाही तोपर्यंत सुरू राहील. आम्हाला माहीत आहे काय सुरू आहे आणि काय नाही. 31 डिसेंबर नंतर हा गँगवार अधिक वाढेल आणि मोठी दुर्घटना घडेल, असा दावा त्यांनी केला.
(हेही वाचा: भाजपला मत देईल, तोच रामलल्लाचं दर्शन घेईल, असा कायदा केलाय का? शहांच्या वक्तव्यावरून राऊतांचं टीकास्त्र )