विनाअनुदानित शाळांना 20 टक्के अनुदानाचा टप्पा जाहीर, राज्यावर 1 हजार 160 कोटींचा बोजा

20 ते 40 टक्के आणि 40 ते 60 टक्के अनुदानासाठी पात्र ठरलेल्या शिक्षकांना या अनुदानाचा लाभ मिळणार आहे.

deepak Kesarkar

मुंबई : राज्यातील विनाअनुदानित आणि अंशत अनुदानित शिक्षक तसेच अघोषित शाळांतील शिक्षकांना अनुदानाचा 20 टक्के टप्पा देण्याची घोषणा शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी गुरुवारी केली. या घोषणेचा विनाअनुदानित आणि अंशत: 60 हजार शिक्षकांना लाभ होणार आहे.

हेही वाचा – राहुल गांधींनी स्वतःच्या आजीचे पत्र तरी वाचले का? आशिष शेलारांचा खोचक प्रश्न

शिक्षकांची गेली 13 ते 14 वर्षे ही मागणी प्रलंबित होती. आता आम्ही ती पूर्ण करण्याचा निर्णय केला आहे. मंत्रिमंडळाने 20 टक्के अनुदान वाढीच्या टप्प्यास आज तत्वत: मंजुरी दिली आहे. ज्या शाळा 20 टक्के अनुदानावर होत्या, त्यांना 40 टक्के, ज्या 40 टक्क्यांवर होत्या, त्यांना 60 टक्के तर, ज्या शाळा 60 टक्के अनुदानावर होत्या त्यांना आता 80 टक्के अनुदान प्राप्त होणार आहे. 20 टक्के अनुदानाचा लाभ दिल्यामुळे वर्षाला राज्यावर 1 हजार 160 कोटींचा बोजा येणार आहे, अशी माहिती केसरकर यांनी दिली.

हेही वाचा –  हम सब एक है; सर्वच पक्षातील बडे नेते जामीनावर अन् राजकारणात सक्रिय!

ज्या शाळा अघोषित होत्या, त्यांनी मान्यतेसंदर्भातल्या अटी पूर्ण केल्या नव्हत्या, त्या शाळांतील शिक्षकांनासुद्धा 20 टक्के अनुदानाचा लाभ होईल. या सर्व शाळांची आम्ही वर्गवारी केली आहे, पहिल्या गटात 387, दुसऱ्या गटात 284, तिसऱ्या गटात 1 हजार 711 आणि चौथ्या गटात 2 हजार 154 शाळा आहेत. आज हा निर्णय मंत्रिमंडळासमोर येऊ शकला नाही. मात्र लवकरच तो मंत्रिमंडळापुढे जाईल, असे केसरकर यांनी सांगितले.

यापूर्वी 20 टक्के अनुदानाचा टप्पे दिले आहेत. मात्र त्याचा लाभ मर्यादित शिक्षकांना झाला होता. आमच्या निर्णयाचे तब्बल 60 हजार शिक्षक लाभार्थी आहेत, त्यामुळे या निर्णयाची व्याप्ती मोठी आहे. शिक्षकांप्रती आमच्या सरकारची भावना कळकळीची आहे, असे केसरकर म्हणाले.

हेही वाचा – बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर गोमूत्र शिंपडल्याप्रकरणी शिंदे गटाने दाखल केली तक्रार