घरमहाराष्ट्रमुंबईकर महिलांसाठी मोबाईल जिम; महाराष्ट्र शासनाचं महिला दिनाचं खास गिफ्ट

मुंबईकर महिलांसाठी मोबाईल जिम; महाराष्ट्र शासनाचं महिला दिनाचं खास गिफ्ट

Subscribe

मंत्री लोढा म्हणाले, मैदानात पुरुष व्यायाम करु शकतात. महिलांना मैदानात व्यायाम करता येत नाही. त्यामुळे मुंबईत खास महिलांसाठी मोबाईल व्यायाम शाळा असेल. जेणेकरून महिला तेथे व्यायाम करु शकतील. तसेच मुंबईतील १५ वॉर्डमध्ये महिलांसाठी सुविधा केंद्र सुरु केले जाणार आहे. या सुविधा केंद्रात कपडे धुवण्याची मशिन असेल.

मुंबईः मुंबईकर महिलांसाठी खास मोबाईल जिम सुरु होणार असल्याची घोषणा महिला आणि बाल विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी बुधवारी विधानसभेत केली. यासह मुंबईकर महिलांसाठी असलेल्या विशेष योजनांची घोषणा मंत्री लोढा यांनी केली. या योजना मुंबईत यशस्वी झाल्या तर संपूर्ण महाराष्ट्रात त्या लागू होतील, असेही मंत्री लोढा यांनी जाहिर केले.

मंत्री लोढा म्हणाले, मैदानात पुरुष व्यायाम करु शकतात. महिलांना मैदानात व्यायाम करता येत नाही. त्यामुळे मुंबईत खास महिलांसाठी मोबाईल जिम असेल. जेणेकरून महिला तेथे व्यायाम करु शकतील. तसेच मुंबईतील १५ वॉर्डमध्ये महिलांसाठी सुविधा केंद्र सुरु केले जाणार आहे. या सुविधा केंद्रात कपडे धुवण्याची मशिन असेल. तेथे महिलांना अंघोळ करण्याची सुविधादेखील असेल. हे सुविधा केंद्रही फिरते असले. त्याच्या निविदा मंजूर झाल्या आहेत. येत्या तीन महिन्यात मोबाईल जिम व सुविधा केंद्र प्रत्यक्षात सुरु होईल, असे मंत्री लोढा यांनी जाहिर केले.

- Advertisement -

तसेच महिलांसाठी मुंबईत खास अभ्यासिका असेल. जेथे महिला वाचन करु शकतील. अभ्यास करु शकतील. त्याचबरोबर महिलांसाठी स्किल सेंटरही सुरु करण्यात येणार आहे. या स्किल सेंटरमध्ये महिलांना विविध अभ्यासक्रम शिकवले जातील. महिलांच्या कौशल्याला प्रोत्साहन दिले जाईल. महिलांसाठी असलेल्या या योजना जर मुंबईत यशस्वी झाल्या तर संपूर्ण महाराष्ट्रात त्या राबवल्या जातील, असेही मंत्री लोढा यांना स्पष्ट केले.

पुढे मंत्री लोढा म्हणाले, महिलांचाही खास आठवडा बाजार सुरु केला जाणार आहे. महिला बचत गटांना आठवडा बाजारासठी जागा दिली जाईल. ही जागा मोफत उपलब्ध करुन दिली जाईल. जेणेकरून महिलांना प्रोत्साहन मिळेल. महिलांसाठी अजूनही काही योजना आहेत. या योजना नंतर जाहिर केल्या जातील. मात्र लिव्ह जिहादच्या मुद्द्यावरुन जे मोर्चे निघत आहेत ते उत्स्फुर्तपणे निघत आहेत. आंतरजातीय विवाहासाठी जी समिती तयार केली आहे. त्या समितीच्या अध्यादेशात कोणत्याही धर्मावर टीका केलेली नाही. दुसरी श्रद्धा वालकर होऊ नये यासाठी ही समिती तयार केली आहे, असे मंत्री लोढा यांनी स्पष्ट केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -