Eco friendly bappa Competition
घर महाराष्ट्र State Guest देवेंद्र फडणवीस यांचे जपानमध्ये मराठमोळ्या पद्धतीने स्वागत

State Guest देवेंद्र फडणवीस यांचे जपानमध्ये मराठमोळ्या पद्धतीने स्वागत

Subscribe

जपान सरकारच्या विशेष निमंत्रणावरून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे 20 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 दिवसांच्या जपान दौर्‍यावर रवाना झाले आहेत. ते जपानमध्ये पोहोचताच त्यांचे मराठमोळ्या पद्धतीने स्वागत देखील करण्यात आले.

मुंबई : जपान सरकारच्या विशेष निमंत्रणावरून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे 20 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 दिवसांच्या जपान दौर्‍यावर रवाना झाले आहेत. यामुळे पायाभूत सुविधा प्रकल्प, गुंतवणुकीला चालना मिळणार असल्याची माहिती आहे. फडणवीस हे State Guest म्हणून जपानमध्ये पोहोचले असून ते याबाबतची सर्व माहिती त्यांच्या ट्विटरच्या पोस्टमधून देत आहेत. देवेंद्र फडणवीस हे जपानमध्ये पोहोचताच त्यांचे मराठमोळ्या पद्धतीने स्वागत देखील करण्यात आले. (State Guest Devendra Fadnavis welcomed in Japan in Maratha style)

हेही वाचा – State Guest: जपान सरकारकडून विशेष निमंत्रण येताच देवेंद्र फडणवीस 5 दिवसांच्या दौर्‍यावर रवाना

- Advertisement -

या दौर्‍यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जपानमधील अनेक वरिष्ठ मंत्र्यांना भेटणार आहेत. जायका, जेट्रो, जेरा यासारख्या अनेक गुंतवणूकदारांच्याही ते या दौर्‍यात भेट घेणार असून, जपान-इंडिया असोसिएशनच्या पदाधिकार्‍यांनाही ते भेटतील. जायकाने राज्यातील अनेक प्रकल्पांना अर्थसहाय्य केले आहे, हे याठिकाणी उल्लेखनीय आहे. राज्यातील गुंतवणुकीसंदर्भात काही कंपन्यांसोबत त्यांच्या बैठका सुद्धा होणार आहेत. जपानमधील बुलेट ट्रेन आणि टोकियो मेट्रो ऑपरेशन्सला सुद्धा या दौर्‍यात ते भेटी देणार आहेत. 20 ते 25 ऑगस्ट या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या या दौर्‍यात त्यांचे भरगच्च कार्यक्रम राहणार आहेत. आपल्या या दौर्‍यात वाकायामा या शहराला सुद्धा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भेट देणार आहेत.

जपान दौऱ्यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अनेक महत्त्वाचे कार्यक्रम असले तरी त्यांचे तिथे स्वागत मात्र दणक्यात झाले आहे. याबाबत ट्वीटमध्ये फडणवीस यांनी लिहिले आहे की, “जपानमध्ये महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन! आज जपान दौर्‍याच्या पहिल्याच दिवशी विमानतळावर उतरल्याबरोबर महाराष्ट्राच्या संस्कृतीचे अभूतपूर्व दर्शन घडले. जपानमध्ये स्थित भारतीयांनी विमानतळावर माझे जंगी स्वागत केले. ज्याप्रमाणे माझे कुटुंबीय माझे औक्षण करतात अगदी तसेच स्वागत माझे जपानमध्ये झाले. भारतीयांनी गायलेले ‘लाभले आम्हास भाग्य’ या गीताने जपान अगदी महाराष्ट्रमय झाल्यासारखे वाटले. खरंच जपानमध्ये आल्यानंतर आपली संस्कृती आणि महाराष्ट्रावरचे प्रेम, आपले भारतीय किंचितही विसरले नाहीत. त्यांनी माझ्यावर केलेल्या प्रेमवर्षावाने मी अतिशय सुखावलो आहे. खूप खूप धन्यवाद जपान या आतिथ्य आणि प्रेमासाठी!”

- Advertisement -

- Advertisment -