घरमहाराष्ट्रप्रलंबित प्रश्नांसाठी अपंगदिनी उपोषणाचा इशारा

प्रलंबित प्रश्नांसाठी अपंगदिनी उपोषणाचा इशारा

Subscribe

अंपगाच्या प्रलंबित मागण्या पूर्ण व्हाव्यात म्हणून राज्य अपंग कर्मचारी संघटना रत्नागिरी येथील जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयाबाहेर उपोषण करणार आहे. ३ डिसेंबरला जागतिक अंपगदिनी हे उपोषण केले जाणार आहे.

शासनाकडे वारंवार अर्ज, विनंती करूनही अपंग समाजबांधवांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत कोणतीच कार्यवाही केली जात नसल्याच्या निषेध केला जात आहे. याच्या निषेधार्थ राज्य अपंग कर्मचारी संघटनेच्या रत्नागिरी जिल्हा शाखेने उपोषणाचा पर्याय निवडला आहे. शाखेचे सचिव आनंद त्रिपाठी यांनी अपंग दिनी ३ डिसेंबरला जिल्हा परिषदेसमोर लाक्षणिक उपोषणाची घोषणा केली आहे. अपंगांना अजूनही त्याच्या आवश्यकेनुसार सोई दिल्या नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

या आहेत मागण्या

“जिल्ह्यातील अपंग समाजबांधवांना अनेक समस्या भेडसावत आहेत. जिल्हा परिषदेच्या तळमजल्यावर अपंग बांधवांसाठी सर्व सोयींनी युक्त अपंग कक्ष मिळावा, अपंग कर्मचाऱ्यांची स्वतंत्र सेवाज्येष्ठता यादी तयार करून अनुशेष भरावा, अपंग कर्मचाऱ्यांना वेतनेतर अनुदानातून, तसेच सामान्य अपंगांना सेस फंडातून सहाय्यक उपकरणे मिळावीत आदी मागण्या प्रलंबित आहेत. मागील अनेक वर्षांपासून सरकारकडे कागदी पाठपूरावा करुनही आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत. अपंगासाठी सरकार विविध योजना राबवते मात्र त्याचा लाभ पूर्णपणे होत नाही. यासाठी जागतिक अंपगदिनी जिल्हा परिषदेसमोर उपोषणाला बसणार आहे. अपंगाच्या प्रलंबित मागण्या पूर्ण कराव्यात या बाबतीत लेखी आश्वासन सरकारकडून मिळणे आवश्यक आहे” – शाखेचे सचिव आनंद त्रिपाठी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -