Thursday, June 8, 2023
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी राज्यात दंगली घडवणाऱ्यांना सोडणार नाही; गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांचा इशारा

राज्यात दंगली घडवणाऱ्यांना सोडणार नाही; गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांचा इशारा

Subscribe

राज्यातील आकोला आणि छत्रपती संभाजीनगर याठिकाणी दोन गटांत दगडफेक झाल्याची घटना घडली. या घटनेनंतर पोलिसांनी दोन्ही ठिकाणची परिस्थिती नियंत्रणात आणली. या दगडफेकीप्रकरणी अनेकांना ताब्यात घेण्यात आले. या पार्श्वभूमीवर आता राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिला आहे.

राज्यातील आकोला आणि छत्रपती संभाजीनगर याठिकाणी दोन गटांत दगडफेक झाल्याची घटना घडली. या घटनेनंतर पोलिसांनी दोन्ही ठिकाणची परिस्थिती नियंत्रणात आणली. या दगडफेकीप्रकरणी अनेकांना ताब्यात घेण्यात आले. या पार्श्वभूमीवर आता राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिला आहे. तसेच, ‘महाराष्ट्रात कोणालाही दंगली घडू देणार नाही, जे दंगली घडवण्याचे प्रयत्न करत आहेत त्यांना अद्दलही घडवणार हे मात्र नक्की’, असा इशाराही दिला. (State Home Minister Devendra Fadnavis comments on riots in Akola and Chhatrapati Sambhaji Nagar VVP96)

नेमके काय म्हणाले फडणवीस?

- Advertisement -

“राड्याच्या दोन्ही ठिकाणी पूर्णपणे शांतता आहे. पोलीस हे अलर्ट मोडवर होते. त्यामुळे कुठेही अशी अप्रिय घटना घडली नाही. काही लोक दगडफेक करत असल्याचे लक्षात येताच सगळीकडचे पोलीस त्याठिकाणी पोहोचले. त्यानंतर आता सर्वस्थिती नियंत्रणात आहे”, असे दवेंद्र फडणवीस म्हणाले. शिवाय, “महाराष्ट्रात कोणालाही दंगली घडू देणार नाही, जे दंगली घडवण्याचे प्रयत्न करत आहेत त्यांना अद्दलही घडवणार हे मात्र नक्की”, असा इशाराही फडणवीसांनी दिला.

“हे 100 टक्के जाणून बुजून होत आहे. याला कोणाची तरी फूस आहे. कोणीतरी जाणीवपूर्वक महाराष्ट्रातील कायदासुव्यवस्था बिघडवण्याचे प्रयत्न करत आहेत. पण हे प्रयत्न यशस्वी होणार नाहीत. अशाप्रकारे जे करत आहेत, त्यांना आम्ही सोडणार नाही”, असेही दवेंद्र फडणवीस म्हणाले.

- Advertisement -

याशिवाय, “काही प्रमाणात नक्की राजकीय नेत्यांचा यामध्ये सहभाग आहे. काही लोक आहेत, काही संस्था आहेत, ही लोक मागून याला आग लावण्याचे प्रयत्न करत आहेत. हे सर्व बाहेर आणीन”, असे सांगत देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला.


हेही वाचा – ‘मविआ’मध्ये उद्धव ठाकरेंची अवस्था दरबारातल्या सरदारासारखी”, नितेश राणेंचा उद्धव ठाकरेंना टोला

- Advertisment -