Sunday, February 21, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी 'माझा फोन टॅप होतोय'; जितेंद्र आव्हाडांच्या ट्विटने खळबळ

‘माझा फोन टॅप होतोय’; जितेंद्र आव्हाडांच्या ट्विटने खळबळ

राज्याचे गृहमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आपला फोन टॅप होत असल्याचा दावा केला आहे.

Related Story

- Advertisement -

काही महिन्यांपूर्वी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आपला फोन टॅप होत असल्याचा दाव केला होता. त्यांनी थेट भाजपचे नाव घेत भाजपच्या एका माजी मंत्र्याने आपला फोन टॅप केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर आता राज्याचे गृहमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आपला फोन टॅप होत असल्याचा दावा केला आहे. ट्विटरच्या माध्यमातून त्यांनी ही माहिती दिली आहे. तसेच whatsappवर देखील निगराणी ठेवली जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास ट्विटच्या माध्यमातून त्यांनी हा दावा केला असून त्यांच्या या ट्विटमुळे राजकीय वातावरणात एकच खळबळ उडाली आहे.

काय म्हणाले जितेंद्र आव्हाड?

- Advertisement -

राज्याचे गृहमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास आपला फोन टॅप होत असल्याच्या आशयाचे ट्विट केले आहे. त्यात ते म्हणाले आहे की, ‘माझा फोन टॅप होत असल्याचा मला संशय येत आहे. विशेष म्हणजे काही एजन्सीजकडून माझ्या whatsappवर देखील निगराणी ठेवली जात असल्याचे मला वाटत आहे’.

कोणाकडून केला जात आहे फोन टॅप?

महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांनी यापूर्वी फोन टॅप होण्याचा आरोप केला होता. मात्र, फोन टॅपिंग कोणाकडून केले जात आहे, याबाबत कोणतीही माहिती किंवा कोणाचेही नाव घेण्यात आलेले नाही. त्यामुळे अनेक तर्कवितर्क लावण्यात येत आहेत. मात्र, जितेंद्र आव्हाडांचा रोख कोणाकडे आहे हे पाहावे लागणार आहे. विशेष म्हणजे याबाबत महाविकास आघाडी काही निर्णय घेणार का हे देखील पहाणे तितकेच महत्त्वाचे ठरणार आहे.


- Advertisement -

हेही वाचा – आगामी महापालिका निवडणुका महाविकास आघाडी एकत्र लढणार


 

- Advertisement -