घरठाणेमहागाई आवरती घ्या अन्यथा पुढचा काळ कठीण : जितेंद्र आव्हाड

महागाई आवरती घ्या अन्यथा पुढचा काळ कठीण : जितेंद्र आव्हाड

Subscribe

मुंबईसह देशभरात महागाई दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या वाढत्या महागाईमुळे सर्वसामन्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. या सर्वसामान्यांच्या जीवनाश्यक वस्तुंची होणारी दरवाढ लक्षात घेता देशभरात केंद्र सरकारविरोधात आंदोलन करण्यात आली. अशातच आता राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनीही वाढत्या महागाईवरून इशारा दिला आहे.

मुंबईसह देशभरात महागाई दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या वाढत्या महागाईमुळे सर्वसामन्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. या सर्वसामान्यांच्या जीवनाश्यक वस्तुंची होणारी दरवाढ लक्षात घेता देशभरात केंद्र सरकारविरोधात आंदोलन करण्यात आली. अशातच आता राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनीही वाढत्या महागाईवरून इशारा दिला आहे. “उपाशीपोटीच क्रांती घडते एवढं लक्षात घ्या त्यामुळे महागाई आवरती घ्या. महागाईवर काहीतरी बोला. अन्यथा पुढचा काळ कठीण आहे”, असा इशारा गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिला आहे.

‘मागच्या मार्चमध्ये महागाईचा दर ७.२ होता आता महागाईचा दर १४ वर पोचला आहे याचा अर्थ महागाई कधी नव्हे एवढी ७० वर्षात शिगेला पोचली आहे. ७० वर्षात कॉंग्रेसने म्हणजे आम्ही काय केले बोलणार्‍यांना आम्ही महागाई जागतिक बाजारात होती तेव्हा रोखून धरली होती आता जागतिक बाजारात महागाई नाहीय. पण आपल्या देशात आहे’ असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं.

- Advertisement -

‘पेट्रोल-डिझेल आणि गॅसचे भाव कुठे पोचले आहेत हे एखाद्या गृहिणीला विचारा. तसंच, गाडी वापरणाऱ्या मध्यमवर्गीयालाही विचारा. एकंदरीतच महागाई सर्वसामान्यांना भाजून काढत आहे. उन्हाचा चटका कमी तर महागाईचा चटका जास्त बसतोय मात्र आपण फक्त मिडिया, पेपरमध्ये, राजकीय चर्चेतसुध्दा काय पहातो आहे तर फक्त नको त्या विषयांना विषय बनवले जात आहे. एकंदरीतच महागाई कुणाच्या लक्षात येऊ नये म्हणून हे केले जात आहे’ असंही जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं.

कोण अयोध्येत गेला काय किंवा राममंदिरात गेला काय, सर्वसामान्यांच्या जीवनात महागाईचे जे चटके बसत आहेत ते कमी होणार आहेत का? असा संतप्त सवालही यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला. ‘महागाईकडे लोकांचे दुर्लक्ष व्हावं आणि तुमच्या हेडलाईन्स महागाईवर कसं बोलू नये यासाठी हे सर्व केलं जातंय व त्या ट्रॅपमध्ये तुम्ही अडकताय आणि आम्हाला त्या ट्रॅपमध्ये अडकायचं नाहीय. आम्ही फक्त महागाईवर बोलणार ते कुठेही जाऊदेत. आम्हाला काही करायचं नाही. मात्र एक लक्षात ठेवा लोकं आज ‘श्रीराम’ म्हणतायत, महागाई इतकी वाढू देऊ नका की त्यांना ‘राम नाम सत्य’ आहे म्हणावं लागेल’, असा टोलाही जितेंद्र आव्हाड यांनी लगावला.

- Advertisement -

‘राज ठाकरे अयोध्येत जाऊदेत किंवा अमृतसरला. कोण कुठे जाणार आहेत त्याच्याशी आम्हाला काय करायचं आहे. त्यांना कुठली सुरक्षा देणार आहेत त्याच्याशी आमचा काय संबंध त्यांना मोसा चिमुर द्या नाहीतर अमेरीकेची सीआयए द्या’ अशी उपरोधिक टिकाही जितेंद्र आव्हाड यांनी केली. ‘महागाईचा दर १४ वर पोचला आहे. देशातील प्रत्येक नागरिकाने यावर चर्चा करायला हवी पण तुम्हा लोकांना सवय लागलीय नको त्या विषयांना नको त्या विषयांकडे घेऊन जायचं’, असेही जितेंद्र आव्हाड यांनी सुनावले.


हेही वाचा – गुणरत्न सदावर्तेंनी घरात पाळलाय चक्क गाढव, नाव ठेवलंय ‘मॅक्स’; गाढवामुळे चर्चांना उधाण

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -