घरमहाराष्ट्रराज्याला कुपोषणाचा विळखा; वर्षभरात 26 हजार बालकांचा मृत्यू

राज्याला कुपोषणाचा विळखा; वर्षभरात 26 हजार बालकांचा मृत्यू

Subscribe

कुपोषणामुळे राज्यातील विविध भागांतून मागील एका वर्षात तब्बल २६ हजार ६१९ इतकी बालके मृत्युमुखी पडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मेळघाट आणि नंदुरबार या आदिवासीबहुल भागांमध्ये बालमृत्यूचे प्रमाण झपाट्याने वाढत आहेच, मात्र त्यामध्ये आता मुंबई, नागपूर, पुणे आणि नाशिक या शहरांचाही समावेश झाला आहे.

राज्याला पडलेला कुपोषणाचा विळखा अजूनही सुटलेला नाही. मेळघाट आणि नंदुरबार या आदिवासीबहुल भागांमध्ये बालमृत्यूचे प्रमाण झपाट्याने वाढत आहेच, मात्र त्यामध्ये आता मुंबई, नागपूर, पुणे आणि नाशिक या शहरांचाही समावेश झाला आहे. कुपोषणामुळे राज्यातील विविध भागांतून मागील एका वर्षात तब्बल २६ हजार ६१९ इतकी बालके मृत्युमुखी पडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ज्यात ५ वर्षांखालील बालकांची संख्या २७५४ इतकी आहे, तर एक वर्षापर्यंतच्या बालकांची संख्या २३ हजार ८६५  इतकी आहे.

यामुळे भाजप सरकारमधील महिला आणि बालकल्याण विभागाच्या कामकाजाविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
अमरावती जिल्ह्यातील मेळघाटात धारणी, चिखलदरा तालुक्यात सप्टेंबर २०१७ ते जानेवारी २०१८ या दरम्यान एक वर्षातील १०६ बालकांचा मृत्यू झाला.पाच वर्षांपर्यंत २७ बालके या दोन जिल्ह्यात मृत्यू पावली. याच काळात नंदुरबारमध्ये ४६ बालमृत्यूंची नोंद झाली.

- Advertisement -

सरकार म्हणते, मृत्यू कुपोषणामुळे नाही !

या बालमृत्यूंमागे कुपोषण हे कारण नाही, असा दावा राज्य सरकारने हिवाळी अधिवेशनात कुपोषणावरील चर्चेवरील उत्तरात केला आहे. मुलांचे कमी वजन असणे, क्षयरोग, जंतूसंसर्ग, श्वसनदाह अशी या बालमृत्यूंमागे कारणे आहेत. हेल्थ मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टमच्या अहवालानुसार २०१७-२०१८ या काळात २४ तासांच्या आत ३७७८ इतक्या अर्भकांचा मृत्यू झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. या काळात एकट्या मुंबईत मृत्यूमुखी पडलेल्या ४८३ बालकांची संख्या असल्याचे सांगण्यात आले.

पुणे महामेट्रोवर होणार कारवाई

 

- Advertisement -

४ हजार झाडे तोडली, शून्य झाडे लावली

पुणे आणि पिंपरी- चिंचवडदरम्यान धावणार्‍या, मेट्रो मार्गिकेवरील तोडाव्या लागलेल्या शेकडो झाडांच्या बदल्यात 4 हजार झाडे लावण्याची हमी, महामेट्रोने घेतली होती. मात्र, मुदत संपूनही मेट्रोकडून झाडांची लागवड करण्यात आलेली नाही. त्यामुळे मेट्रो विरोधात कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा, पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून देण्यात आला आहे.
लाखो रूपये खर्च करत, सुस्थितीत असलेले रस्ते खोदून उभारले गेलेले पिलर ,बेकायदेशीररित्या केलेले उत्खनन आणि आता मेट्रोच्या मार्गात येणारी शेकडो झाडे तोडूनही त्याबदल्यात एकाही झाडाचे पुन्हा रोपण करण्यात आले नाही. ही सगळी पुणे महामेट्रोच्या ढिसाळ कारभाराची उदाहरणे आहेत.याविरोधात नागरिकांचे म्हणणे ऐकून घेणे तर दूरच, मेट्रोचे अधिकारी, पिंपरी- चिंचवड महानगर पालिकेच्या अधिकार्‍यांनाही जुमानत नसल्याची बाब समोर आली आहे.

metro
मुदत संपूनही मेट्रोकडून झाडांची लागवड करण्यात आलेली नाही

अडीच कोटी गेले कुठे?

पिंपरी-चिंचवड महापालिकेचे अधिकारी चुकीचे आरोप करत असल्याचे सांगत, यापुढे आपण वृक्षारोपणाचे काम वेगाने करू, अशी मेट्रोच्या अधिकार्‍यांनी ग्वाही दिली. मात्र, चार हजार वृक्षांची लागवड मागील वर्षी करायची होती. मात्र ती का करण्यात आली नाही. या प्रश्नावर मेट्रोच्या अधिकार्‍यांनी महापालिकेकडे बोट दाखवत, जबाबदारी झटकली. झाडांचे स्थलांतर आणि रोपण करण्यासाठी सुमारे अडीच कोटी रूपये खर्च करण्यात येणार आहे. मग असे असूनही वेळेत काम पूर्ण न करणार्‍या ठेकेदारांवर मेट्रो प्रशासन मेहरबान का, हा प्रश्न या निमित्ताने उभा राहत आहे.

Pravin Puro
Pravin Purohttps://www.mymahanagar.com/author/ppravin/
विविध वृत्तपत्रांमध्ये ३२ वर्ष पत्रकारिता. वृत्तपत्र आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. राजकीय, सामाजिक, राज्य आणि राष्ट्रीय विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -