घरमहाराष्ट्रराज्यात भीषण दुष्काळ?

राज्यात भीषण दुष्काळ?

Subscribe

राज्यात सध्या दुष्काळाची भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. ३१ ऑक्टोबरपर्यंत सरकार दुष्काळ जाहीर करण्याची शक्यता आहे.

पावसानं दिलेली ओढ, सरासरीपेक्षा कमी झालेला पाऊस यामुळे आता राज्यात भीषण दुष्काळाची परिस्थिती उभी राहिली आहे. यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झाली. शिवाय, परतीच्या पावसानं देखील ओढ  दिल्यानं शेतकरी पूरता हवालदील झाला आहे. त्याचा परिणाम हा शेतीवर देखील झाला आहे. अनेक धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा देखील शिल्लक नाही. त्यामुळे जूनपर्यंत तग धरायची कसा हा प्रश्न आता उभा राहिला आहे. कोकण, मराठवाडा, विदर्भ, खानदेशात सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे धरणांमध्ये देखील पाणीसाठा नाही. परिणामी दुष्काळ जाहीर करा अशी मागणी आता केली जात आहे. नाशिकमध्ये देखील पाण्याची भीषण टंचाई जाणवू शकते. नाशिकमधील धरणातील पाणीसाठ्यावर मराठवाड्यातील पुढारी आणि जनता हक्क सांगत आहेत. पण नाशकातील तब्बल ५५९ गावांना पाणीटंचाईल सामोरं जावं लागणार आहे. नुकत्याच केलेल्या सर्व्हेक्षणातून ही बाब समोर आली आहे. नाशिकसह इगतपुरी, निफाड, चांदवड, कळवण, देवळा आणि त्र्यंबकेश्वरमध्ये देखील पाणी पातळी एक एक मीटरपर्यंत खाली गेल्याचे आता सर्व्हेक्षणातून समोर आले आहे.

सरकारपुढे देखील संकट

पावसानं ओढ दिल्यानं आता जनता पुरती हवालदिल झाली आहे. काही गावांना तर पावासाळा संपतो न संतपो तोच टँकरनं पाणीपुरवठा करावा लागावा अशी स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे सरकारपुढे देखील आता मोठा प्रश्न उभा राहिला आहे. सरकारी पातळीवर देखील त्याचा आढावा घेतला जात आहे. परिणामी ३१ ऑक्टोबर पर्यंत दुष्काळ जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पावसानं ओढ दिल्यानं मागील काही वर्षापासून राज्याला दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. २०१५साली तर लातूरला रेल्वेनं पाणीपुरवठा करावा लागला होता. दुसरीकडे कोकणात देखील पावसानं ओढ दिल्यानं पाणीसाठ्यामध्ये घट झाल्याचं चित्र पाहायाला मिळत आहे. जनावरांच्या चाऱ्यापासूनचा प्रश्न निर्माण होतो. २०१५ साली झालेल्या दुष्काळामध्ये तर सरकाला चारा छावण्या देखील सुरू कराव्या लागल्या होता. सध्याची परिस्थिती पाहता सरकारची देखील आता कसोटी लागणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -