घरCORONA UPDATECorona : राज्यमंत्री शंकरराव गडाख क्वारंटाईन; तर पत्नी कोरोना पॉझिटिव्ह

Corona : राज्यमंत्री शंकरराव गडाख क्वारंटाईन; तर पत्नी कोरोना पॉझिटिव्ह

Subscribe

राज्याचे जलसंधारण (minister) मंत्री (shankarrao gadakh) शंकरराव गडाख यांच्या पत्नीला कोरोनाची लागण झाली असल्याने मंत्र्यांनी स्वतःच क्वारंटाईन होण्याचा निर्णय घेतला आहे. ही माहिती त्यांनी स्वतः (tweet) ट्विट करून दिली आहे. शंकरराव गडाख यांनी ट्विटरवरू म्हटले आहे की. मी क्वॉरंटाइन झालो असून कुणीही मला भेटायला येऊ नये. शंकरराव गडाख यांच्या पत्नी आणि (nevasa) नेवासा पंचायत समितीच्या माजी सभापती (sunita gadakh) सुनिताताई गडाख यांची काल कोरोना चाचणी करण्यात आली होती. आज त्यांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्यांना हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

- Advertisement -

शंकरराव गडाख यांनी ट्विटर आणि फेसबुकवरून ही माहिती दिली. यामध्ये आपण होम क्वॉरंटाइन होणार असून काही दिवस कुणालाही भेटणार नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. शिवाय तुम्हीही तुमच्या घरीच राहा. कुटुंबीयांची काळजी घ्या, असे आवाहन त्यांनी केले आहे.

दरम्यान, राष्ट्रवादीचे मराठवाड्यातील विधान परिषद सदस्य बाबाजानी दुर्रानी यांनाही कोरोनाची लागण झाली असून त्यांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. तसेच त्यांच्या कुटुंबीयांना होम क्वारंटाइन करण्यात आले असून त्यांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेण्यात येत आहे. दुर्रानी यांची प्रकृती स्थिर असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले. आतापर्यंत राज्यातील अनेक नेत्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामध्ये अशोक चव्हाण, जितेंद्र आव्हाड, धनंजय मुंडे या मंत्र्यांचा समावेश आहे. मात्र त्यांनी कोरोनावर मात केली आहे.

- Advertisement -

हेही वाचा –

CoronaVirus: जगात झपाट्याने होतोय संसर्ग; १०० तासांत दहा लाख रूग्णवाढ

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -