घरमहाराष्ट्रप्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांच्या विधानाने खळबळ; म्हणाले, "राष्ट्रवादीतून भाजपात जाणारे..."

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांच्या विधानाने खळबळ; म्हणाले, “राष्ट्रवादीतून भाजपात जाणारे…”

Subscribe

शरद पवार यांनी राजीनामा घेण्याचा निर्णय मागे घेतल्यानंतर राष्ट्रवादीतील या नाट्यावर पडदा पडला आहे. पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलेल्या एका विधानामुळे खळबळ माजली आहे.

शरद पवार (Sharad pawar) यांनी पदाचा राजीनामा देण्याची घोषणा केल्यानंतर राष्ट्रवादीतील कार्यकर्त्यांमध्ये एकच खळबळ उडाली. शरद पवार यांनी राजीनामा मागे घ्यावा, यासाठी त्यांची मनधरणी करण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न सुरू केले. त्यानंतर तीन दिवसांत शरद पवार यांनी त्यांचा राजीनाम्याचा निर्णय मागे घेतला. म्हणून आता पुन्हा एकदा शरद पवार हेच राष्ट्रवादीच्या अध्यक्ष पदी कायम राहणार आहेत. त्यांच्या राजीनामा मागे घेण्याच्या घोषणेनंतर शुक्रवारी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. पण त्यांचा राजीनाम्याचा निर्णय ही एक राजकीय खेळी असल्याचे बोलले जात आहे. पण आता शरद पवार यांच्या या निर्णयानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (NCP State president Jayant patil) यांनी केलेल्या एका विधानामुळे खळबळ माजली आहे.

हेही वाचा – शरद पवारांच्या पत्रकार परिषदेत यंग ब्रिगेड; नेमके कसले संकेत

- Advertisement -

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी एका खाजगी वृत्तवाहीनीला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी केलेल्या एका विधानामुळे खळबळ उडाली आहे. पक्षातील अनेकांना भाजपमध्ये जायचं आहे, असं पवारांनीच पुस्तकात लिहिलं आहे आणि आता त्यांनी निवृत्तीचा निर्णय घेतला याचा अर्थ तुम्हाला जे करायचंय ते करा; असं पवारांना सूचित करायचं आहे का? असा प्रश्न जयंत पाटील यांना मुलाखतीत विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देत पाटील म्हणाले की, “भाजपसोबत जाण्याचा विचार करणारे काही लोक पक्षात असू शकतात. परंतु त्यांची संख्या मर्यादित असेल. मात्र माझ्यासमोर अशी भूमिका कुणीही व्यक्त केलेली नाही,”

तसेच, “राष्ट्रवादी काँग्रेसला (NCP) आज विस्तार करण्याची संधी आहे. राज्यात अस्तित्वात आलेल्या महाविकास आघाडीच्या प्रयोगाला चांगला प्रतिसाद मिळतो आहे. महाविकास आघाडी तुटावी असं कुणाला वाटत असेल तर त्यांना रोखण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे,” असेही जयंत पाटील यांच्याकडून यावेळी सांगण्यात आले.

- Advertisement -

पण राष्ट्रवादीतून भाजपमध्ये जाणारी लोकं असू शकतात की आहे? असा प्रश्न आता त्यांच्या या विधानामुळे निर्माण झालेला आहे. तर गेल्या काही दिवसांपूर्वी अजित पवार हे नाराज असून ते लवकरचं भाजप पक्षात प्रवेश करणार असल्याचे बोलले जात होते. तसेच त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे आणखी काही आमदार हे भाजपात जाणार असल्याचे बोलले जात होते, तसे संकेत भाजपच्या नेत्यांकडूनही मिळू लागले होते. त्यामुळे आता जयंत पाटील यांनी केलेल्या विधानामुळे खरंच राष्ट्रवादीचे आमदार की नेते हे भाजपमध्ये जाणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -