घरCORONA UPDATEचालत जाणाऱ्या मजुरांसाठी परिवहन आयुक्त स्वतः रस्त्यावर उतरले

चालत जाणाऱ्या मजुरांसाठी परिवहन आयुक्त स्वतः रस्त्यावर उतरले

Subscribe

देशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. त्यामुळे लॉकडाऊनमध्ये मुंबईसह देशात विविध ठिकाणी अडकलेल्या मजुरांना त्यांच्या गावी सोडण्यासाठी श्रमिक ट्रेन चालविण्यात येत आहे. मात्र त्या सुद्धा अपुऱ्या पडत असल्याने अनेक श्रमिक आपला जीव धोक्यात घालून माल वाहतूक वाहनांमधून प्रवास करताना दिसत आहेत. त्यामुळे या प्रवाशांना रोखण्यासाठी खुद्द परिवहन आयुक्त शेखर चन्ने रस्त्यावर शुक्रवारी उतरले होते. त्यांनी स्वतः मुंबई-आग्रा मार्गावरून जाणाऱ्या एका माल वाहतूक वाहनाची तपासणी करून तब्बल ३१ प्रवाशांची सुटका करत वाहन चालकाविरोधात कारवाईचा बडगा उगारला.

मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवारी परिवहन आयुक्त शेखर चन्ने यांनी मुंबई-आग्रा मार्गाला अचानक भेट दिली. तसेच दोषी वाहनांविरोधात कारवाई केली. गेल्या आठवड्याभरात आरटीओकडून प्रवासी वाहतूक करणाऱ्या तब्बल २५० माल वाहतूक वाहनांवर कारवाई केली आहे. अवैध प्रवासी वाहतुक प्रकरणी २५ वाहने जप्तही करण्यात आली आहेत. परिवहन आयुक्तांनीही कारवाई पाहण्यासाठी याठिकाणी भेट दिली. तसेच स्वतः उभे राहून आरटीओ कर्मचाऱ्यांबरोबर वाहनांची तपासणी केली. त्यात एका माल वाहतूक करणाऱ्या वाहनातून श्रमिक जीव धोक्यात प्रवास करताना त्यांना दिसून आले. त्यांनी तात्काळ वाहनाला थांबवून तब्बल ३१ प्रवाशांची सुटका करत वाहन चालकाविरोधात कारवाई केली. या कारवाईचा व्हिडियो समाज माध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर राज्यात सर्वच आरटीओंकडून कडक कारवाईस सुरूवात झाली आहे.

- Advertisement -

काय आहे व्हिडीओ

व्हायरल होणाऱ्या व्हिडियोमध्ये माल वाहतूक वाहनामधून ३१ प्रवासी खाली उतरताना दिसतात. या प्रवाशांमध्ये तरूणांची संख्या मोठी असून महिला आणि लहान मुलांचाही समावेश आहे. परिणामी, कुटुंबासह जीव धोक्यात घालून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सुखरूप घरी पोहचण्यासाठी परिवहन विभागानेही पुढाकार घेतला आहे. गेल्या सहा दिवसांत तब्बल १ हजार बसेसच्या माध्यमातून २० हजार स्थलांतरित कामगारांना सीमेपर्यंत सोडण्यात परिवहन विभागाला यश आले आहे. परिणामी, माल वाहतूक करणाऱ्या वाहनांनी अवैधपणे प्रवाशांची वाहतूक करू नये, असे आवाहन परिवहन विभागाने केले आहे.

भिवंडीरोडवर ट्रॅफिक पोलिसांनी केलं चेकिंग, खच्चा खच भरलेल्या ट्रकमधून जात होते मजुर

भिवंडीरोडवर ट्रॅफिक पोलिसांनी केलं चेकिंग, खच्चा खच भरलेल्या ट्रकमधून जात होते मजुर

आपलं महानगर – My Mahanagar ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಶನಿವಾರ, ಮೇ 16, 2020

- Advertisement -

 

दोन्ही आघाडीवर चन्नेचे उत्कृष्ट काम

संपुर्ण राज्याचा परिवहन विभागाचा भार असलेले परिवहन आयुक्त शेखर चन्ने यांना एसटी महामंडळाच्या व्यस्थापकीय संचालक पदाचा अतिरिक्त भार देण्यात आला आहे. अगोदरच शेखर चन्ने यांच्याकडे लाॅकडाऊनच्या काळात राज्यातील मालवाहतूक आणि इतरही वाहतूक विषयांमध्ये राज्याचा परिवहन विभागाचा भार आहे. त्याचबरोबर एसटी महामंडळातील अत्यावश्यक सेवा, अडकलेल्या नागरिकांनी घरी पोहोचवणे तसेच परराज्यातून महाराष्ट्राचा मजदुरांना, विद्यार्थ्यांना आणि नागरिकांना राज्यात घेऊन येण्याचं काम युद्धपातळीवर सुरु आहे. या दोन्ही आघाडीवर परिवहन आयुक्त शेखर चन्ने उत्कृष्ट काम करत आहे. त्यामुळे त्यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.

Nitin Binekar
Nitin Binekarhttps://www.mymahanagar.com/author/bnitin/
गेल्या ५ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सार्वजनिक वाहतूक, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -