घरताज्या घडामोडीमुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातून महिला अत्याचाराच्या सर्वाधिक तक्रारी, राज्य महिला आयोगाचा दावा

मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातून महिला अत्याचाराच्या सर्वाधिक तक्रारी, राज्य महिला आयोगाचा दावा

Subscribe

मागील काही दिवसांपासून राज्यात बेपत्ता मुलींच्या आकडेवारीत वाढ होत असल्याचं दिसून येत आहे. मार्च महिन्यात राज्यातील तब्बल २ हजार २०० मुली बेपत्ता झाल्याचं आकडेवारीतून स्पष्ट झालं आहे. अशातच राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी महाराष्ट्रातून २०२२ मध्ये ५३५ महिला-मुली बेपत्ता झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय. त्याचप्रमाणे मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातून महिला अत्याचाराच्या सर्वाधिक तक्रारी असल्याचा दावा राज्य महिला आयोगाने केला आहे.

राज्य महिला आयोगाच्या ‘महिला आयोग आपल्या दारी’ उपक्रमांतर्गत ठाणे जिल्ह्याची आढावा बैठक घेतली. यावेळी जनसुनावणी देखील आयोजित करण्यात आली होती. यामध्ये एकूण १७४ महिलांनी तक्रारी नोंदवल्या होत्या. त्यामुळे ठाण्यातून आलेल्या तक्रारी राज्यातील सर्वाधिक तक्रारी असल्याची माहिती अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी दिली आहे.

- Advertisement -

महिला आणि बालकांचे प्रश्न, महिलांसाठी असलेल्या विविध शासकीय योजनांची अंमलबजावणी, महिला विरोधातील गुन्हे आणि त्याचा तपास याचा सविस्तर आढावा घेण्यात आला. यावेळी महिला बाल विकास, कामगार, परिवहन, आरोग्य, पोलीस, शिक्षण. अशा विविध विभागांची माहिती घेतली.

जनसुनावणीच्या निमित्ताने ठाणे शहर आणि ग्रामीणमधून एकूण १७४ तक्रारदार आपल्या तक्रारी घेऊन आल्या होत्या. यामध्ये सर्वाधिक ११६ कौटुंबिक समस्या असल्याच्या तक्रारी होत्या. महाराष्ट्रात फिरत असताना हा माझा २४वा जिल्हा असून, या २४ जिल्ह्यांपैकी सर्वाधिक तक्रारी या ठाणे जिल्ह्यातून आल्या आहेत, असंही रुपाली चाकणकर म्हणाल्या.

- Advertisement -

मार्च महिन्यात राज्यातून २२०० मुली बेपत्ता झाल्या आहेत, त्याआधी फेब्रुवारी महिन्यात ही संख्या १८१० इतकी होती. त्यामुळे एकाच महिन्यात बेपत्ता होणाऱ्या मुलींच्या संख्येत ३९० ने वाढ झाल्याचं स्पष्ट झालं आहे.


हेही वाचा : धक्कादायक! राज्यात बेपत्ता मुलींच्या आकडेवारीत वाढ, दररोज 70 मुली


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -