Thursday, February 25, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र नात्याला काळीमा, अंगावर चटके, मारहाण करत चिमुकल्यांचा छळ

नात्याला काळीमा, अंगावर चटके, मारहाण करत चिमुकल्यांचा छळ

क्रूर सावत्र आई आणि वडीलांनीच केले निर्घृण कृत्य

Related Story

- Advertisement -

नाशिकमधील इगतपुरी तालुक्यातील लहान चिमुकल्यांना चटके देत अमानुष मारहाण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. लहान मुलांवर अत्याचार आणि मारहाण केल्याच्या अनेक घटना समोर येत आहे. नाशिकमध्ये निर्दयी सावत्र आई वडीलांनीच आपल्या दोन चिमुकल्यांचा अंगावर चटके देत अमानुष मारहाण करत छळ केला आहे. याप्रकरणी मुलांच्या मामाने पोलिसांना माहिती दिली आहे. आईच्या निधनानंतर सावत्र आई आणि वडिल दररोज मुलांचा छळ करत असल्याचे मामाने सांगितले आहे. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाख करण्यात आला आहे. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन आरोपींना अटक केली आहे. यामध्ये वडील स्वतः रेल्वे पोलीस कर्मचारी असल्याचे समजते आहे. मुलांना सध्या निशिक जिल्हा रुग्णालयात दाखल केले असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत.

- Advertisement -

या प्रकरणात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना इगतपुरी तालुक्यातील शहरात घडली आहे. तक्रारीनुसार आरोपी सावत्र आई आणि वडिलांना ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणात आरोपी वडील राहूल मोरे हे स्वतः रेल्वे पोलीस कर्मचारी आहेत. आरोपी राहूल मोरे हे आपल्या सावत्र पत्नीसह पहिल्या पत्नीच्या दोन मुलांसह राहतात. दोन मुलांपैकी मुलगा ८ वर्षांचा तर मुलगी ५ वर्षांची मुलगी आहे. तसेच या दोन्ही मुलांचा प्रचंड छळ होत असल्याचे मुलांच्या मामाने अहवालात सांगितले असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.

मुलांच्या मामाने दिलेल्या माहितीनुसार, एके दिवशी मुलांचा रडण्याचा आवाज ऐकून स्थानिक नागरिक गोळा झाले. नागरिकांनी घडलेल्या संबंधित प्रकार मुलांच्या मामाला सांगितला. मामा माहिती मिळताच मामाने मुलांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मुलांच्या आजीने मुलांचे वडील आणि सावत्र आईविरोधात पोलिसांत तक्रार नोंदविली आहे. या तक्रारीनुसार सावत्र आई आणि वडीलांना अटक करण्यात आली आहे.

- Advertisement -