घरताज्या घडामोडीStock Market Closed: शेअर बाजारात मोठी पडझड, सेन्सेक्समध्ये २७०० पेक्षा अधिक अंकांची...

Stock Market Closed: शेअर बाजारात मोठी पडझड, सेन्सेक्समध्ये २७०० पेक्षा अधिक अंकांची घसरण

Subscribe

रशिया आणि युक्रेनमधील संघर्षामुळे आज(गुरूवार) शेअर बाजारात मोठी पडझड झाली. मुंबईत शेअर बाजाराच्या निर्देशांक सेन्सेक्समध्ये २७०० पेक्षा अधिक अंकांची घसरण झाली असून ५४,५३० वर शेअर बाजार बंद झाला आहे. दुसरीकडे शेअर बाजाराच्या निफ्टीतही ८१५ अंकांची घसरण होऊन १६,२२७ इतक्या अंकांवर बंद झाली.

बीएसई सेन्सेक्स २८०० अंकांनी घसरला

सेन्सेक्सने १८५० अंकांच्या घसरणीसह व्यवहाराला सुरुवात केली. रशिया आणि युक्रेनच्या संघर्षामुळे शेअर बाजारात मोठी घसरण झाली. मागील काही दिवसांपूर्वी बीएसई सेन्सेक्स २८०० अंकांनी घसरला होता. आज झालेल्या घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे तब्बल नऊ लाख कोटींहून अधिक नुकसान झालं आहे. निफ्टी ४१४ अंकांच्या घसरणीसह १६,६४८ अंकांनी घसरला आहे. जवळपास सहा दिवसांपासून शेअर्समध्ये घसरण होत आहे.

- Advertisement -

बाजार लाल चिन्हावर बंद

शेअर बाजाराची सुरूवात जरी हिरव्या चिन्हाने झाली असली तरी बाजार लाल चिन्हावर बंद झाला. ३० शेअर्सचा सेन्सेक्स ६८ अंकांनी घसरून ५७,२३२ वर बंद झाला, तर निफ्टी २९ अंकांनी घसरून १७,०६३ वर बंद झाला आहे.

दरम्यान, रशिया-युक्रेन युद्ध सुरू झाल्याचे समजताच बाजारात चौफेर शेअर्सची विक्री होताना दिसत आहे. प्री-ओपनिंगमध्ये ३ टक्क्यांपासून शेअर बाजार घसरण्यास सुरुवात झाली. आयसीआयसीआय बँकेचा शेअर खुलताच ४ टक्क्यांनी घसरला आहे. सर्व सेक्टोरियल इंडेक्स कोसळले आहेत.

- Advertisement -

हेही वाचा : PMLA कायद्याअंतर्गत २० वर्षांत ३१ जणांना अटक, केंद्राने सुप्रीम कोर्टात जाहीर केला ईडीचा लेखा जोखा


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -