घरक्राइमउपमुख्यमंत्री फडणवीस पालकमंत्री असलेल्या अकोला जिल्ह्यात पुन्हा दगडफेक

उपमुख्यमंत्री फडणवीस पालकमंत्री असलेल्या अकोला जिल्ह्यात पुन्हा दगडफेक

Subscribe

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पालकमंत्री असलेल्या अकोला जिल्ह्यात पुन्हा एकदा दोन गटांत जोरदार राडा झाल्याची माहिती समोर आली आहे. अकोला जिल्ह्यातील संवेदनशील परिसर असणाऱ्या अकोटफैल परिसरात प्रेमविविहाच्या प्रकरणावरून दोन गट एकमेकांसमोर आले आणि त्याचवेळी त्यांच्याकडून दगडफेक करण्यात आली.

अकोला : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पालकमंत्री असलेल्या अकोला जिल्ह्यात पुन्हा एकदा दोन गटांत जोरदार राडा झाल्याची माहिती समोर आली आहे. अकोला जिल्ह्यातील संवेदनशील परिसर असणाऱ्या अकोटफैल परिसरात प्रेमविविहाच्या प्रकरणावरून दोन गट एकमेकांसमोर आले आणि त्याचवेळी त्यांच्याकडून दगडफेक करण्यात आली. या घटनेमुळे परिसरात तणापूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. ज्या परिस्थितीवर पोलिसांनी काही वेळात नियंत्रणात मिळवले. परंतु, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पालकमंत्री असलेल्या अकोला जिल्ह्यात सहा महिन्यात दुसऱ्यांदा अशी घटना घडल्याने पुन्हा एकदा कायदा सुव्यस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. तर देवेंद्र फडणवीस हे गृहमंत्री असूनही याचा फायदा काय? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित करण्यात येत आहे. (Stone pelting again in district where Deputy CM Devendra Fadnavis is Guardian Minister)

हेही वाचा – उत्तरकाशी: बोगद्यात 9 दिवसांपासून 41 मजूर कसे राहात आहेत? सीसीटीव्ही फुटेज प्रथमच समोर

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, काल (ता. 20 नोव्हेंबर) रात्री अकोला जिल्ह्यातील अकोटफैल परिससरात अवैध दारूच्या दुकानावरून आणि प्रेमविवाहावरून दोन गट समोरासमोर आले. यानंतर दोन गटांच झालेल्या या वादामध्ये एका गटाकडून दुसऱ्या गटाच्या लोकांच्या घरावर दगडफेक करण्यात आली. ज्यामुळे परिसरात काही काळासाठी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेनंतर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत संपूर्ण परिसराचा ताबा घेतला. या घटनेत आतापर्यंत पेक्षा अधिक लोकांना ताब्यात घेण्यात आले असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. तर अकोटफैल भागात आज सकाळपासून सर्व व्यवहार सुरळीत सुरू झाले आहेत.

अकोल्यात सहा महिन्यांपूर्वी देखील दोन गटात मोठा राडा झाला होता. त्यावेळी परिसरात दंगलसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. त्या घटनेमध्ये एकाचा मृत्यू झाला होता. ज्यानंतर पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आणि कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी संचारबंदी लागू केली होती. कालच्या घटनेनंतर सध्या शहरातील परिस्थिती नियंत्रणात असून नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, तसेच पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, राज्याचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस हे अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, तरी सुद्धा या जिल्ह्यात कायदा सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे. तर देवेंद्र फडणवीस जिल्ह्याकडे कानाडोळा करत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -