घरमहाराष्ट्रछत्रपती संभाजीनगरछ. संभाजीनगरमधील ओहर गावात दगडफेक; CRPF, पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात

छ. संभाजीनगरमधील ओहर गावात दगडफेक; CRPF, पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात

Subscribe

छत्रपती संभाजीनगरमधील ओहर गावात दोन गटात दगडफेक झाल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर ओहर गावात सीआरपीएफचे जवान आणि पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. 

छत्रपती संभाजीनगरमधील ओहर गावात दोन गटात दगडफेक झाल्याची माहिती समोर येत आहे. दोन गटातील या दगडफेकीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. मात्र, या घटनेत अनेक जण जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. जखमींना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर ओहर गावात सीआरपीएफचे जवान आणि पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. (Stone pelting in two groups at ohar village in Sambhaji Nagar A large force of police has been deployed)

मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगरपासून १० किलोमीटरच्या अंतरावर असलेल्या ओहर गावात दोन गटात शुक्रवारी सकाळच्या सुमारास राडा झाला. अज्ञात कारणावरून राडा झाला असून थोड्याचवेळात दगडफेकही झाली. सध्या याठिकाणची परिस्थिती नियंत्रणात आहे. तसेच, परिसरात शांततापूर्ण वातावरण निर्माण झाले आहे.

- Advertisement -

मात्र, दोन गटात झालेल्या या दगडफेकीत आठ ते दहा जण जखमी झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. या घटनेत जखमी झालेल्यांना छत्रपती संभाजीनगरमधील घाटी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलेले आहे. रुग्णलयात दाखल करतेवेळी काहींना पोलिसांच्या व्हॅनमधून तर काहींना रुग्णवाहिकेतून दाखल करण्यात आले.

राम नवमीच्या पूर्वसंध्येला दोन गटात राडा

दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच म्हणजेच राम नवमीच्या पूर्वसंध्येला छत्रपती संभाजीनगरमधील किराडपुरा भागातील राम मंदिरात तयारीसाठी जमलेल्या तरुणांच्या एका गटाचा दुसर्‍या गटाशी राडा झाला. हा वाद टिपेला पोहचताच दोन्ही गटांकडून एकमेकांवर तुफान दगडफेक करण्यात आली. अनियंत्रित झालेल्या या जमावाने पोलिसांसह इतर १५ वाहनांना लक्ष्य करून जाळपोळही केली. जमावावर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. तसेच जमावाला पांगवण्यासाठी सौम्य लाठीमारही करावा लागला, तर पोलिसांच्या गोळीबारात एक जण गंभीर जखमी झाला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – नाशिक : काळाराम मंदिरांतील वागणूकीने संयोगिताराजे छत्रपती भडकल्या: म्हणाल्या, हे श्रीरामा…

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -