Eco friendly bappa Competition
घर महाराष्ट्र छत्रपती संभाजीनगर राज्यात पुन्हा दगडफेक; नंदुरबार, छ. संभाजीनगर महामार्गावर दोन गटांत तुफान राडा

राज्यात पुन्हा दगडफेक; नंदुरबार, छ. संभाजीनगर महामार्गावर दोन गटांत तुफान राडा

Subscribe

छत्रपती संभाजीनगर येथील कराडपुर आणि ओहर गावात दोन गटात दगडफेक झाल्याची घटना घडली. ही घटना ताजी असतानाच पुन्हा महाराष्ट्रात दोन ठिकाणी दोन गटात दगडफेक झाल्याची माहिती समोर येत आहे. नंदुरबार आणि छत्रपती संभाजीनगर महामार्गावर दोन गटात दगडफेक झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे

छत्रपती संभाजीनगर येथील कराडपुर आणि ओहर गावात दोन गटात दगडफेक झाल्याची घटना घडली. ही घटना ताजी असतानाच पुन्हा महाराष्ट्रात दोन ठिकाणी दोन गटात दगडफेक झाल्याची माहिती समोर येत आहे. नंदुरबार आणि छत्रपती संभाजीनगर महामार्गावर दोन गटात दगडफेक झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. दोन्ही घटनेत एकूण ५ जण गंभीर जखमी झाले आहेत. (Stone pelting The storm raged in two groups on the Nandurbar and Chhatrapati Sambhaji Nagar highway)

छत्रपती संभाजीनगर महामार्गावर दगडफेक

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील गजराज नगरमध्ये ही घटना घडली. किरकोळ वादातून दोन गटात आधी राडा झाला. त्यानंतर या राड्याचे रुपांतर दगडफेकीत झाले. या दगडफेकीत वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या दगडफेकीत तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. या दगडफेकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा मोठा फौजफाट तैनात करण्यात आला आहे.

नंदुरबारमध्ये दगडफेक

- Advertisement -

नंदुरबारमधील महाराष्ट्र व्यायाम शाळा परिसरात दोन गटात तुफान राडा झाला असून दगडफेकही झाली आहे. या दगडफेकीत 2 पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत. येथील दगडफेकीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. या ठिकाणी जमावाकडून दुचाकींचे मोठ्या प्रमाणात नुकसान करण्यात आले आहे. घटनास्थळी सध्या पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच, पोलीस संबंधित घटनेतील आरोपींचा शोध घेत आहेत.

ओहर गावात दगडफेक

छत्रपती संभाजीनगरमधील ओहर गावात ३१ मार्च रोजी दोन गटात जोरदार राडा झाला होता. त्यावेळी दगडफेक झाली होती. या दगडफेकीत 10 जण जखमी झाले होते. ओहर गाव हे छत्रपती संभाजीनगरपासून 10 किलोमीटरच्या अंतरावर आहे.

दरम्यान, मालवणी येथे गुरूवारी दोन गटात राडा झाला होता. त्यानंतर दगडफेकही झाली होती. याप्रकरणी पोलिसांना परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी लाठीचार्ज करावा लागला होता. तसेच, याप्रकरणी ताब्यात घेतलेल्यांविरोधात FIR दाखल करण्यात आला आहे. 353, 354, 332, 143, 147, 149 या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.


हेही वाचा – “उद्धव ठाकरे घरकोंबडा, यापुढे देवेंद्र फडणवीसांबद्दल अपशब्द वापरले तर रस्त्यावर फिरणे मुश्किल करु”

- Advertisment -