Wednesday, June 7, 2023
27 C
Mumbai
घर क्राइम काळाराम मंदिर परिसरात घरावर दगडफेक

काळाराम मंदिर परिसरात घरावर दगडफेक

Subscribe

दुचाकीवरून आलेल्या अनोळखी दोघांनी घरावर दगडफेक केल्याची घटना गुरूवारी रात्री काळाराम मंदिर परिसरात घडली. याप्रकरणी उमेश अरविंद पुजारी यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, पुजारी यांची आई, पत्नी व मुले घरात असताना दुचाकीवरून दोन अनोळखी व्यक्ती त्यांच्या घरावर आले. काही समजण्याआधीच त्यांनी पुजारींच्या घरावर दगडफेक करून पळ काढला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक वाय.एस. माळी करत आहेत.

चोरट्याने सोन्याची पोत हिसकावली

दुचाकीवरून आलेल्या भामट्यांनी रस्त्याने पायी जाणार्‍या महिलेच्या गळ्यातील ७० हजार रूपये किंमतीची सोन्याची चेन हिसकावून पळ काढल्याची घटना गुरूवार (दि.६) सायंकाळी सात वाजेच्या सुमारास दिंडोरी रोडवर कलानगरच्या बालाजी चौक येथे घडली. याप्रकरणी ज्योती देविदास परब यांनी तक्रार दाखल केली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, ज्योती परब पवार किराणातून साहित्य खरेदी करून घराच्या दिशेने पायी जात होत्या. त्यावेळी विरुद्ध दिशेने दुचाकीवरून आलेल्या दोघांपैकी एकाने त्यांच्या गळ्यातील ७० हजार रूपये किंमतीची सोन्याची चेन हिसकावून पळ काढला. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक भडीकर करत आहेत.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -