घरमहाराष्ट्रएअरपोर्टवरील महिला प्रवाशांची गैरसोय थांबवा; शिवसेनेची इंडिगो एअरलाइन्सकडे मागणी

एअरपोर्टवरील महिला प्रवाशांची गैरसोय थांबवा; शिवसेनेची इंडिगो एअरलाइन्सकडे मागणी

Subscribe

नुकत्याच एका डॉक्टर महिलेने इंडिगो एअरलाइनमार्फत मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलमधून हवाई प्रवास केला. या प्रवासादरम्यान चेकिंग बोर्डिंग केल्यानंतर सदर महिलेला मासिक पाळी आली ही बाब डॉक्टर महिलेने इंडिगो एअरलाइनच्या महिला कर्मचारीला सांगितली व सॅनिटरी पॅडची मागणी केली. परंतु सदर महिलेला एअरलाईन अशा कोणत्याही प्रकारे आपली मदत करू शकत नाही असे उत्तर इंडिगो एअरलाइनच्या महिला कर्मचाऱ्याने दिले. याप्रकरणाची सदर महिलेने शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाकडे केली. यानंतर इंडिगो एअरलाईला आता शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाने  मुंबई एअरपोर्टवरील महिलांची कुचुंबना थांबवण्याची मागणी केली आहे.

नेमकी घटना काय? 

नुकत्याच एका डॉक्टर महिलेने इंडिगो एअरलाइनमार्फत मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलमधून हवाई प्रवास केला. मात्र या डॉक्टर महिलेला ज्यावेळई एअरपोर्टवर सिक्युरिटी चेकिंग केली, त्याचदरम्यान तिला मासिक पाळी आली. परंतु तिने चेक-इन केल्यामुळे तिला पुन्हा बाहेर येऊन मेडिकल किंवा इतर ठिकाणाहून सॅनिटरी पॅड विकत घेणे शक्य नव्हते. त्यामुळे तिने इंडिगो एअरलाइनकडे अनेक विनवण्या केल्या, यानंतर एका महिला स्टाफने वैयक्तिकरित्या सदर महिलेला सॅनिटरी पॅड उपलब्ध करून दिला. मात्र हा विषय अतिशय गंभीर असल्याने सदर महिलेने झालेल्या गैरसोयीबाबत शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाकडे लेखी तक्रार नोंदवली.

- Advertisement -

त्या अनुषंगाने शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे अध्यक्ष शिवसेना सचिव, खासदार अनिल देसाई यांच्या सूचनेनुसार शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाच्या शिष्टमंडळाने इंडिगो एअरलाइनच्या मुंबई हेड आकृती बागवे व एअरपोर्ट मॅनेजर बेनी फर्नांडिस यांची त्वरित भेट घेतली, या भेटील त्यांनी सदर महिलेसोबत झालेल्या प्रकाराबाबत लेखी निवेदन दिले व सॅनिटरी पॅड वेंडिंग मशीन एअरपोर्टच्या परिसरात असणे गरजेचे आहे तसेच सॅनिटरी पॅडची उपलब्धता महिला ग्राहकांना करून देणे ही एअरलाईनची जबाबदारी आहे आणि तशी सुविधा विमानामध्ये देखील एअरलाइनने करावी अशी मागणी कक्षाच्या वतीने सरचिटणीस विजय मालणकर व सचिव निखिल सावंत यांनी केली.

- Advertisement -

या मागण्या योग्य असून सदर विषय गंभीर आहे व वरिष्ठांशी चर्चा करून सर्व विमानांमध्ये ही सोय उपलब्ध करून देण्यासाठी पाठपुरावा करू असे आश्वासन बैठकीदरम्यान बागवे यांनी शिष्टमंडळाला दिले. या शिष्टमंडळात कार्यकारणी सदस्य मनोज जाधव, कक्ष लोकसभा चिटणीस संजय पावले, सहचिटणीस कृष्णाकांत शिंदे, विक्रम शहा, मिलिंद तावडे, बाळा रेडकर व विजय पवार आदी उपस्थित होते.


परब- सोमय्या पुन्हा आमनेसामने; ठाकरे गटातील कार्यकर्त्यांचं म्हाडा कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन

 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -