घरक्राइमATS ला धक्का! मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचा तपास थांबवून कागदपत्रे NIA कडे...

ATS ला धक्का! मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचा तपास थांबवून कागदपत्रे NIA कडे द्या – ठाणे सत्र न्यायालय

Subscribe

ठाणे सत्र न्यायालयाचे ATS ला आदेश

मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचा तपास थांबवून कागदपत्रे NIA कडे द्या, असे आदेश ठाणे सत्र न्यायालयाने दिले आहेत. तुमचा तपास तात्काळ थांबवा आणि हत्या प्रकरणाची सर्व कागदपत्रे विनाविलंब एनआयएकडे सोपवा, असं आदेशात स्पष्ट म्हटलं आहे. मनसुख हिरेन यांच्या हत्येचा तपासही केंद्र सरकारने एनआयएकडे दिला आहे. तशी अधिसूचना यापूर्वीच काढली आहे. तरीही एटीएस तपास सुरू ठेवून आरोपींची कोठडीही मिळवत आहे. त्यांचा तपास तात्काळ थांबवून कागदपत्रे आमच्याकडे देण्याचा आदेश द्यावा, अशा विनंतीचा एनआयएचा अर्ज न्यायालयाने मान्य केला आहे. त्यामुळे ATS आणि राज्य सरकारला मोठा झटका आहे.

सचिन वाझे यांचा ताबा घेण्यासाठी कोर्टात २५ मार्चला दावा करणार – एटीएस

मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानी आढळलेल्या स्फोटकांनी स्कॉर्पिओ प्रकरणी NIA च्या अटकेत असलेले सचिन वाझे यांची २५ मार्चला कोठडी संपणार आहे. दरम्यान, मनसुख हिरेन हत्या प्रकरणात देखील त्यांचं नाव आलं आहे. या प्रकरणात ते मुख्य आरोपी आहेत. मनसुख हिरेन हत्येचा तपास ATS करत आहे. सचिन वाझे यांच्या विरोधात पुरावे सापडल्याचा दावा ATS ने केला असून २५ मार्चला न्यायालयात सचिन वाझे यांचा ताबा घेण्यासाठी दावा करणार आहोत. याची माहिती एटीएस प्रमुख जयदीप सिंग यांनी पत्रकार परिषदेत दिली.

- Advertisement -

मनसुख हिरेन यांचा ATS तपास करत असताना अनेक आरोप त्यांच्यावर करण्यात आले होते. मनसुख यांच्या पत्नीने सचिन वाझे यांच्यावर आरोप केले होते. या अनुषंगाने वाझे यांचा तपास सुरू होता. सचिन वाझे यांनी त्यांच्यावरील आरोप फेटाळले असले तरी ATS ने अनेक पुरावे हाती घेतले आहेत. सदर गुन्ह्याचा तपास सुरू आहे. अनेक जणांची नावं पूढे येत आहेत. अनेक ठिकाणचे CCTV फुटेज ताब्यात घेण्यात आले आहेत. आरोपींनी काही पुरावे नष्ट करण्याचे प्रयत्न केला असे पुरावे आम्ही ताब्यात घेतले आहेत, असं ATS प्रमुखांनी सांगितलं.

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -