घरताज्या घडामोडीबदली थांबवा, जिल्हा वाचवा

बदली थांबवा, जिल्हा वाचवा

Subscribe

पोलीस अधिक्षक सचिन पाटील यांच्या बदलीविरोधात नाशिककर एकवटले

रेव्ह पाटर्या, हुक्का पार्टी, अवैध गुटख्या प्रकरणी बेधकड कारवाईचा बडगा उगारणारे, रोलेट किंगचा पर्दाफाश करणारे नाशिकचे ग्रामीण पोलीस अधिक्षक सचिन पाटील यांची मुंबई येथे बदली झाल्याने नाशिककरांमध्ये नाराजी पसरली आहे. अल्पावधीतच गुन्हेगारांचा कर्दनकाळ ठरणारे कर्तव्यदक्ष अधिकारी सचिन पाटील यांची बदली रद्द करावी या मागणीसाठी आता नाशिककर एकवटले असून शेतकर्‍यांनी तर रस्त्यावर उतरून जनआंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. तर सोशल मिडीयावरही पाटील यांची बदली रद्द करण्याच्या मागणीसाठी मोहीम सुरू करण्यात आली आहे. पाटील यांच्या समर्थनार्थ शहरातील चौकांमध्ये होर्ल्डिंगची झळकविण्यात आले आहेत.

शेतकरयांच्या एका शिष्टमंडळाने नुकतीच पालकमंत्री छगन भुजबळ यांची भेट घेत पोलीस अधिक्षकांची बदली रद्द करण्याची मागणी केली आहे. सप्टेंबर २०२० मध्ये नाशिकचे पोलीस अधिक्षक म्हणून सचिन पाटील यांनी पदभार स्वीकारल्यानंतर जिल्ह्याची कायदा सुव्यवस्था अबाधीत ठेवण्यासाठी कुणाचाही मुलाहिजा न ठेवता कठोर पाऊले उचलली. त्यातून काही मंडळींचे हितसंबंध टोकाचे दुःखावले गेल्याने त्यांच्या बदलीचे षडयंत्र यशस्वीपणे राबवून ते अंमलातही आणले गेल्याचा आरोप करण्यात येत आहे. अवघ्या दहा अकरा महिन्यात सचिन पाटील यांच्यासारखा कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी या जिल्ह्यातून कार्यकाल पुर्ण होण्याआधीच बदलून जात असल्याने जिल्ह्याच्या कानाकोपर्‍यात राहणारा समान्य माणूस तसेच शेतकरी वर्ग प्रचंड नाराज आहे. पाटील यांच्या बदलीमागे शेतकर्‍यांना फसविणारी व्यापारी वर्ग, रोलेटचा जुगार चालविणारे, विविध प्रकारचे अवैध धंदे चालक, गुटखा आणि रेती तसेच भुमाफीया आणि या सर्व अवैध प्रवृत्तींना अभय देणारे राजकारण कारणीभूत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.

- Advertisement -

पाटील यांनी शेती मालाचे पैसे बुडवून शेतकर्‍यांना देशोधडीला लावणार्‍या व्यापार्‍यांच्या मुसक्या बांधल्या, तरूणाईला फाशी पाडून अनेक संसार उध्वस्त करणार्‍या ,जुगारात हरल्याने तरूणांना आत्महत्येस प्रवृत्त करणार्‍या रोलेट बादशहाला वेसण घातली, महाराष्ट्रात प्रतिबंधीत असलेला गुटखा व्यापार रोखण्याचा प्रयत्न केला, राजकिय वरहस्त आहे म्हणून परिणामांची चिंता न करता आमदाराच्या आप्तस्वकीयाचा बेकायदेशीर बायो डिझेल पंप उध्वस्त केला, इतकेच नाही तर तरूण पिढीला बरबादीच्या वाटेला घेऊन जाणारे अवैध हुक्का पार्लर ,रेव्ह पार्टींवर कठोर कारवाई करून मुंबईची नाशिक जिल्ह्यात येऊ घातलेली गुन्हेगारी संस्कृती वेशीवर थांबवली त्यामुळे पाटील यांची बदली तात्काळ रद्द करून नाशिक जिल्ह्याला न्याय द्यावा अन्यथा जनआंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.

सोशल मिडीयावर मोहीम
पोलीस अधिक्षक सचिन पाटील यांची बदली जिल्हावासियांवर उगवलेला सुड आहे अशा भावनांचा आशय असलेला मजकूर फेसबुक, व्हाटसअप, ट्विटर, इन्स्टाग्रामवर व्हायरल होत आहे.काही चाहत्यांनी वुई सपोर्ट एसपी सचिन पाटील,बदली थांबवा जिल्हा वाचवा आम्ही सारे शेतकरी सामान्य नाशिककर असा हॅश टॅग चालवून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री यांच्यासह शरद पवार,पोलीस महासंचालक यांनाही टॅग केले.अनेकांनी गृहखात्याला मेलही धाडून सचिन पाटील यांची बदली रद्द करण्याची मागणी केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -