घरताज्या घडामोडीराजू साप्ते प्रकरणात दोषींवर कठोर कारवाई होणार, गृहमंत्र्यांचे निर्देश

राजू साप्ते प्रकरणात दोषींवर कठोर कारवाई होणार, गृहमंत्र्यांचे निर्देश

Subscribe

चित्रपट सृष्टीतील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी कायमस्वरूपी व्यवस्था करणे गरजेचे

मराठी चित्रपट सृष्टीतील वाढलेली गुन्हेगारी आणि दहशत मोडून काढण्याचे निर्देश गृहमंत्री दिलीप वळसे- पाटील यांनी बुधवारी दिले. यापुढे अशाप्रकारची गुंडगिरी खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा देताना साप्ते प्रकरणात दोषी असलेल्या सर्वांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश वळसे- पाटील यांनी दिले. (Strict action will be taken against Raju Sapte case, Home Minister directed)  दिलीप वळसे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात कला दिग्दर्शक राजू साप्ते यांच्या आत्महत्येसंदर्भात तसेच मराठी चित्रपट सृष्टीतील कलाकार, तंत्रज्ञ, निर्माता यांना चित्रपट युनियनच्या पदाधिकाऱ्यांकडून होणाऱ्या त्रासाबद्दल पोलीस विभागाकडून करावयाच्या कार्यवाहीबाबत आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती.

चित्रपट सृष्टीतील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी कायमस्वरूपी व्यवस्था करणे गरजेचे आहे. यापूर्वीच्या सर्व गुन्ह्यांसंदर्भातील दोषींवर कठोर कारवाई करावी. त्यामुळे सर्वावर वचक निर्माण होईल. आवश्यकता भासल्यास विशेष चौकशी समिती नेमण्यात यावी, अशी सूचना वळसे पाटील यांनी बैठकीत केली.

- Advertisement -

कामगार विभागाने या क्षेत्रातील कामगारांना थेट बँकामार्फत वेतन अदा करण्यासाठी आवश्यक ती धोरणात्मक कार्यवाही करावी. कामगारांना संरक्षण देण्यासाठी आणि त्यांच्यामध्ये जागरुकता आणण्यासाठी नवीन धोरण तयार करावे, अशा सूचनाही त्यांनी कामगार आयुक्तांना दिल्या. गृहविभागाच्या नियंत्रणाखाली सर्व संबंधित विभागाची एका स्वतंत्र समिती कायमस्वरूपी गठीत करण्याच्या सूचनाही विभागास देण्यात आल्या.


हेही वाचा – भाईजान आणि त्याच्या बहिणीवर फसवणुकीचा आरोप; चंदिगढ पोलिसांनी पाठवला समन्स

- Advertisement -

 

 

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -