घरताज्या घडामोडी१ एप्रिलपासून धूळ नियंत्रण उपाययोजनेबाबत सक्त अंमलबजावणी; उल्लंघन केल्यास कारवाई

१ एप्रिलपासून धूळ नियंत्रण उपाययोजनेबाबत सक्त अंमलबजावणी; उल्लंघन केल्यास कारवाई

Subscribe

सध्या दिल्ली सोबतच मुंबईतील हवेतील प्रदूषण हे चर्चेचा विषय बनले आहे. याची गंभीर दखल महापालिका आयुक्त इकबाल चहल यांनी घेतली आहे. या प्रदूषणाला इमारत बांधकामांमुळे निर्माण होणारी 'धूळ' कारणीभूत आहे. या धुळीवर म्हणजेच प्रदूषणावर नियंत्रण मिळविण्यासाठी ७ दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत.

मुंबई : सध्या दिल्ली सोबतच मुंबईतील हवेतील प्रदूषण हे चर्चेचा विषय बनले आहे. याची गंभीर दखल महापालिका आयुक्त इकबाल चहल यांनी घेतली आहे. या प्रदूषणाला इमारत बांधकामांमुळे निर्माण होणारी ‘धूळ’ कारणीभूत आहे. या धुळीवर म्हणजेच प्रदूषणावर नियंत्रण मिळविण्यासाठी ७ दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. त्यासाठी अतिरिक्त आयुक्त डॉ. संजीव कुमार यांच्या अध्यक्षतेखाली ७ सदस्यीय समिती गठीत करण्यात आली आहे. (Strict enforcement of dust control measures from April 1 Action in case of violation)

या समितीच्या अहवालानंतर म्हणजे १ एप्रिलपासून धूळ नियंत्रण उपाययोजना सक्त अंमलबजावणी सुरू करण्यात येणार आहे. मात्र या उपाययोजनांचे, नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर कडक कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे. मुंबई महापालिका आयुक्त इकबाल चहल यांनी, मुंबईतील हवेतील प्रदूषण, त्यावरील उपाययोजना या महत्वाच्या बाबींवर महापालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल चहल यांनी रविवारी दूरदृश्य प्रणालीद्वारे तातडीची आढावा बैठक घेतली. त्यावेळी त्यांनी वरीलप्रमाणे आदेश पालिका प्रशासनाला दिले.

- Advertisement -

५ हजार बांधकामे, विकासकामे व हवेतील बदल यांमुळे मुंबईत प्रदूषण

मुंबईत यापूर्वी कधीही नव्हती, अशी हवा प्रदूषण स्थिती निर्माण झाली आहे. कोविड पश्चात कालावधीत मोठ्या प्रमाणावर सुरू झालेली बांधकामे तसेच विविध विकासकामे यातून निर्माण होणारी धूळ, त्याच्या सोबतीला हवेच्या स्थितीमध्ये आणि वेगामध्ये झालेले बदल हे दोन प्रमुख घटक आढळले आहेत. नैसर्गिक स्थिती मानवी नियंत्रणाबाहेर असली तरी मुंबईत सद्यस्थितीत सुमारे ५ हजारपेक्षा अधिक ठिकाणी विविध कामे सुरू आहेत, तिथून निर्माण होणारी धूळ अटकाव करणे आपल्या हातात आहे.

- Advertisement -

प्रदूषण रोखण्यासाठी सात जणांची समिती गठीत

या विविध बांधकामे आणि विकास कामांच्या ठिकाणाहून निर्माण होणारी धूळ नियंत्रित करण्यासाठीच्या उपाययोजना, सर्व संबंधित भागधारकांना त्याविषयी सूचना देऊन उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याची पद्धती आणि उपाययोजना, नियम व सूचना यांचे उल्लंघन केल्यास करावयाची कठोर कारवाई या तीन पैलूंवर सात दिवसांच्या आत अहवाल सादर करण्यासाठी अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. संजीव कुमार यांच्या अध्यक्षतेखाली एकूण सात जणांची समिती गठीत करण्यात आली आहे.

यामध्ये सदस्य म्हणून उपआयुक्त (पर्यावरण), उपआयुक्त (पायाभूत सुविधा), उपआयुक्त (घनकचरा व्यवस्थापन), प्रमुख अभियंता (विकास नियोजन), महानगरपालिका आयुक्त कार्यालयाचे प्रतिनिधी कार्यकारी अभियंता श्री. सतीश गीते आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून नामनिर्देशित सदस्य अशा सहा जणांचा देखील समावेश करण्यात आला आहे.

या समितीकडून अहवाल सादर झाल्यावर त्याआधारे, बई महापालिका क्षेत्रात धूळ नियंत्रणाची अंतिम कार्यपद्धती निश्चित करून ती १ एप्रिल २०२३ पासून लागू केली जाईल. या कार्यपद्धतीचे अथवा कोणत्याही नियमाचे उल्लंघन केल्यास संबंधितांना सूचना देऊन काम थांबवणे व इतर कठोर कारवाई देखील केली जाईल, असे आयुक्तांनी म्हटले आहे.


हेही वाचा –

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -