घरताज्या घडामोडीLockdown In Ratnagiri: २ जूनपासून रत्नागिरीत कडक लॉकडाऊन; दूध आणि किराणा मालाची...

Lockdown In Ratnagiri: २ जूनपासून रत्नागिरीत कडक लॉकडाऊन; दूध आणि किराणा मालाची घरपोच सेवा होणार

Subscribe

राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. त्यामुळे या जिल्ह्यातील लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल करण्यात आले नाही आहेत. यापैकी एक म्हणजे रत्नागिरी जिल्हा. रत्नागिरी जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन २ जूनपासून कडक लॉकडाऊन लागू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. २ जूनच्या सकाळी ७ वाजल्यापासून ते ८ जून सकाळी ७ वाजेपर्यंत रत्नागिरीत कडक लॉकडाऊन असणार आहे. यादरम्यान अत्यावश्यक सेवा पूर्णवेळ सुरू असतील. तसेच इतर दुकाने पुर्णतः बंद राहतील. महत्त्वाचे म्हणजे दूध आणि किराणा मालाची फक्त सेवा सकाळी ७ ते ११ यावेळेत सुरू असणार आहे. दरम्यान रत्नागिरी जिल्ह्यात कडक लॉकडाऊनमध्ये काय सुरू असणार आणि काय बंद असणार जाणून घ्या

रत्नागिरी जिल्ह्यात काय बंद काय सुरू?

  • इतर जिल्ह्यातून येणाऱ्यांना प्रवेश करण्यास बंदी
  • इतर जिल्ह्यात प्रवास करण्यास बंदी
  • नातेवाईकांचे अंत्यसंस्कार किंवा उपचारासाठी रत्नागिरी जिल्ह्यात प्रवेश करण्याची आणि इतर जिल्ह्यात प्रवास करण्याची परवानगी
  • पण रत्नागिरी जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्यांकडे ४८ तासाअगोदर केलेल्या कोरोना चाचणीचे निगेटिव्ह अहवाल असणे गरजेचे
  • शेतीसंबंधित दुकाने सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत सुरू राहतील
  • मालवाहतुकीसाठी कोणतीही बंधने नाहीत. फक्त दुकानापर्यंत माल वितरण करणेपुरती मालवाहतुक मर्यादित राहिल.
  • थेट ग्राहकाला माल देताना येणार नाही
  • जर मालवाहतुकदाराने या नियमांचे उल्लंघन केले तर कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात येईलपर्यंत त्याच्यावर बंदी घालण्यात येईल.

हेही वाचा – मुंबईत अत्यावश्यक सेवेची दुकाने २ वाजेपर्यंत खुली

- Advertisement -

 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -