घरताज्या घडामोडीविद्यार्थी, तरुण 'मातोश्री'च्या मागे उभे; वरुण सरदेसाईंचा दावा

विद्यार्थी, तरुण ‘मातोश्री’च्या मागे उभे; वरुण सरदेसाईंचा दावा

Subscribe

गद्दारांनी स्वताच्या स्वार्थासाठी दगाफटका केल्यानंतर शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा जनाधार मोठ्या प्रमाणात वाढला आहे. विद्यार्थी आणि तरुण मोठ्या संख्येने मातोश्रीच्या मागे ठामपणे उभा आहेत, असे प्रतिपादन युवा सेना सचिव वरुण सरदेसाई यांनी आज येथे केले.

नवी मुंबई : गद्दारांनी स्वताच्या स्वार्थासाठी दगाफटका केल्यानंतर शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा जनाधार मोठ्या प्रमाणात वाढला आहे. विद्यार्थी आणि तरुण मोठ्या संख्येने मातोश्रीच्या मागे ठामपणे उभा आहेत, असे प्रतिपादन युवा सेना सचिव वरुण सरदेसाई यांनी आज येथे केले. पनवेल विधानसभा क्षेत्रातील अनेक कॉलेजमध्ये युवा सेनेचे युनिट सुरू करण्यात आले आहे. आज या युनिटच्या नामफलकाचे उद्घाटन वरुण सरदेसाई यांच्या हस्ते झाले. (Student and Youth standing behind Matoshri Claim by Varun Sardesai)

खारघर येथील सरस्वती इंजिनिअरींग कॉलेज, कामोठे येथील एम जी एम मेडीकल कॉलेज, पनवेल येथील शांतीनिकेतन कॉलेज, आदी ठिकाणी युवा सेनेचे युनिट सुरू करण्यात आले आहेत. या युनिटच्या नामफलकांचे अनावरण युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांच्या हस्ते करण्यात आले.

- Advertisement -

यावेळी शिवसेना रायगड जिल्हा संपर्क प्रमुख बबन पाटील, जिल्हाप्रमुख शिरीष घरत, उपजिल्हा युवाधिकारी अवचित राऊत, उपजिल्हाप्रमुख रामदास पाटील, पनवेल संपर्क प्रमुख योगेश तांडेल, उपमहानगरप्रमुख दिपक घरत, उपजिल्हाप्रमुख भरत पाटील, जिल्हा समन्वयक नितीन पाटील, विधानसभा अधिकारी पराग मोहीते, उपविधानसभा युवाधिकारी अनिकेत पाटील, महेश भिसे, सागर पाटील, सुशांत सावंत, जीवन पाटील यांच्यासह युवासैनिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.

देशपांडे हल्ला ही मनसेची स्टंटबाजी

- Advertisement -

मनसेचे संदीप देशपांडे यांच्यावरील हल्ला हा कसब्यामध्ये भाजपला जी हार पत्करावी लागली त्यामुद्द्यावरून लक्ष दुसरीकडे भरकटवण्यासाठी मनसेने केलेला हा स्टंट आहे. त्यामुळे या बिनबुडाच्या आरोपांकडे आम्ही दुर्लक्ष करणे पसंत केले आहे. या प्रकरणी मनसेने काहीही आरोप केले असले तरी ते गांभीर्याने घेण्याची गरज नाही, अशी प्रतिक्रिया यावेळी वरूण सरदेसाई यांनी व्यक्त केली.


हेही वाचा – मनपाकडून १७ अतिक्रमित दुकाने जमीनदोस्त; मुलुंड स्थानकाबाहेरील जुन्या अतिक्रमणांवर कारवाई

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -