घरमहाराष्ट्रलिपिकाच्या छेडछाडीला कंटाळून विद्यार्थिनीची आत्महत्या

लिपिकाच्या छेडछाडीला कंटाळून विद्यार्थिनीची आत्महत्या

Subscribe

एका खासजी शाळेतील लिपिकाच्या छेडछाडीला कंटाळून १७ वर्षीय विद्यार्थीनीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटाना औरंगाबादमध्ये घडली आहे.

गेल्या आठवड्यात एका तरुणीने छेडछाडीला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बारामतीमध्ये घडल्याचे समोर आले असताना पुन्हा एकदा अशीच घटना घडल्याचे समोर आले आहे. एका १७ वर्षीय विद्यार्थीनीने लिपिकाच्या छेडछाडीला कंटाळून विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची घटना औरंगाबादमध्ये घडल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

नेमके काय घडले?

शाळेतील लिपिकाच्या त्रासाला कंटाळून औरंगाबादमध्ये राहणाऱ्या एका अल्पवयीन तरुणीने आत्महत्या करण्याचे टोकाचं पाऊल उचललं आहे. औरंगाबादमधील सिल्लोड तालुक्यातील उंडनगावात सोमवारी रात्राी हा प्रकार घडल्याचे समोर आले आहे. शाळेतील लिपिक एका बारावीत शिकणाऱ्या १७ वर्षाच्या तरुणीला त्रास देत होता. तसेच त्यांनी विद्यार्थीनीला बारावीच्या निरोप समारंभात येऊन धमकावलं देखील होते. या सततच्या धमक्यांना कंटाळून या तरुणीने राहत्या घरी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. तरुणीच्या नातेवाईकांनी लिपीक संजय घुगरेविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

- Advertisement -

अजिंठा पोलिसांच्या माहितीनुसार आरोपी संजय घुगरे हा सिल्लोडमधील एका खासगी शाळेत लिपिक म्हणून कार्यरत आहे. हा दररोज बसने प्रवास करतो. तसेच संबंधित तरुणीही उंडनगावहून बसने प्रवास करत असे. या प्रवासा दरम्यान तरुणीली छेड काढत असते. याबाबत तरुणीने अनेकदा घरच्यांना सांगितले, घरच्यांनी त्याला समजावूनही संजय घुगरेने छेडछाड बंद केली नाही, असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

संजय घुगरे द्यायचा धमकी

‘मी म्हणेन तसं जर तु वागली नाहीस तर माझ्याकडे असलेले तुझे फोटो आणि व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल करेन. तुझी आणि तुझ्या कुटुंबाची बदनामी करेन’, अशी धमकी घुगरे देत असल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे.

- Advertisement -

वाचा – पाणी टंचाईमुळे शेतकऱ्याने केली आत्महत्या

वाचा – महिला खेळाडूची हत्या की आत्महत्या ?


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -