अहमदनगर : जिल्ह्यातील शिर्डी येथे आज (ता. 17 ऑगस्ट) अखेरीस शासन आपल्या दारी हा कार्यक्रम पार पडला. तीन वेळा तारखा ठरवून देखील हा कार्यक्रम होऊ शकला नाही. पण आज अखेर या कार्यक्रम झाला. पण या कार्यक्रमामुळे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागला. कारण या कार्यक्रमासाठी जिल्ह्यांच्या आगारातून एसटी बसेस सोडल्या न गेल्याने विद्यार्थ्यांना शाळा गाठण्यासाठी नाहक त्रास सहन करावा लागला. (students faced problems due to shasan aplya dari program)
हेही वाचा – “शरद पवारांना ऑफर देणे हा बालिशपणा”, जितेंद्र आव्हाडांची बोचरी टीका
राज्य सरकारच्या महत्त्वकांक्षी अशा शासन आपल्या दारी या कार्यक्रमासाठी हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित राहिले होते. पण या कार्यक्रमासाठी शासनाने वेगवेगळ्या गावातील लोकांना आणण्यासाठी एसटी बसची व्यवस्था केली होती. ज्यासाठी ग्रामीण भागातील नेहमीच्या मार्गावरील फेऱ्या रद्द करण्यात आल्या. दोन दिवसांच्या सुट्टीनंतर शाळा सुरू होत असल्याने अनेक विद्यार्थ्यांना याबाबतची माहिती नव्हती. ज्यामुळे विद्यार्थी बराच वेळ बस स्थानकावर थांबून एसटी बसची वाट पाहताना दिसले.
या कार्यक्रमासाठी काल रात्रीपासूनच कार्यकर्त्यांना आणण्यासाठी एसटी बस ठेवण्यात आल्या होत्या. त्यामुळे आज सकाळपासूनच जिल्ह्यातील सर्व आगारांमधून ग्रामीण भागासाठीच्या फेऱ्या करणाऱ्या बस सुटल्या नाहीत. अनेक आगारांवर आणि बसस्थानकांवर तसे फलकही लावण्यात आले होते. दोन दिवसांच्या सुट्टीनंतर आज शाळा सुरू होत आहे. त्यामुळे सकाळीच शाळेत निघालेल्या विद्यार्थांची यामुळे गैरसोय झाली.
शासन आपल्या दारी या कार्यक्रमामुळे बस येणार नसल्याची माहिती विद्यार्थ्यांना मिळाल्यानंतर त्यांनी खासगी वाहनांचा पर्याय निवडला. पण अनेक विद्यार्थ्यांना ती वाहने देखील न मिळाल्याने ते चांगलेच चिंतेत सापडले होते. परंतु याच वेळी राष्ट्रवादी काँग्रेसमधील शरद पवार यांच्या गटातील राहुरी विधानसभेचे आमदार प्राजक्त तनपुरे हे सकाळीच दौऱ्यावर निघाल्याने त्यांच्या ही गोष्ट लक्षात आली. ज्यानंतर त्यांनी काही विद्यार्थ्यांना आपल्या वाहनातून शाळेत सोडले.
विद्यार्थ्यांच्या झालेल्या गैरसोयीबद्दल बोलताना प्राजक्त तनपुरे म्हणाले की, शासनाच्या या अतिरंजित उपक्रमामुळे संपूर्ण अहमदनगर जिल्ह्यातील लोकांचे, विद्यार्थ्यांचे हाल सुरू आहेत. आज सकाळी अनेक विद्यार्थी शाळा, कॉलेजमध्ये जाण्यासाठी पायपीट करताना दिसले. कारण सर्व एस टी बसेस मुख्यमंत्री महोदयांच्या सेवेसाठी तैनात आहेत. यांच्याकडून कार्यक्रमासाठी गर्दी जमेना म्हणून खूप दुरून लोकं आणावी लागत आहेत, असे ऐकले. याबाबतचे ट्वीट देखील प्राजक्त तनपुरे यांच्याकडून करण्यात आले.
‘शासन आपल्या दारी’ या शासनाच्या अतिरंजित उपक्रमामुळे संपूर्ण अहमदनगर जिल्ह्यातील लोकांचे, विद्यार्थ्यांचे हाल सुरू आहेत. आज सकाळी हे विद्यार्थी शाळा, कॉलेजमध्ये जाण्यासाठी पायपीट करताना दिसले. कारण सर्व एस टी बसेस मुख्यमंत्री महोदयांच्या सेवेसाठी तैनात आहेत. यांच्याकडून… pic.twitter.com/IaLd1VpVsi
— Prajakt Prasadrao Tanpure (@prajaktdada) August 17, 2023