छत्रपती संभाजीनगर : राज्यातील चांद्यापासून बांध्यापर्यंत विकास करण्याचा मानस राज्य सरकारचा असून, त्यामुळेच आज 17 सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत छत्रपती संभाजीनगरमधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नमो 11 कली कार्यक्रम राबविणार असल्याची घोषण केली. यामध्ये त्यांनी सर्वच समाज घटकांसाठी काहींना काही देऊ केले असून, विशेषत: आदिवासी भागातील शाळा आता हायटे होणार आहेत.(Students from tribal schools in the state will become hitech Momentum to be gained from NAMO programs)
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नमो 11 कलमी कार्यक्रमाबाबत माहिती देताना सांगितले की, राज्यातील सर्वच घटकांचा विकास करण्याचा आमचा हेतू असून त्यासाठी गरीब व मागासवर्गीय वस्त्यांचा सर्वांगिण विकास साधण्यासाठी “नमो गरीब व मागासवर्गीय सन्मान अभियान” राबविण्यात येणार आहे. प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून गरीब व मागासवर्गीयांना पक्की घरे बांधून देण्यात येणार आहेत. तसेच वस्त्यांमध्ये पक्क्या रस्त्यांची उभारणी, घरांमध्ये वीजपुरवठा, समाज प्रबोधनाचे काम व्हावे यासाठी समाज मंदिराची उभारणी, गरीब व मागासवर्गीय महिलांना सामाजिक व आर्थिक सक्षम होण्यासाठीही या अभियानातून मदत करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.
राज्यात राबविले जाणार नमो ग्राम सचिवालय अभियान
नमो ग्राम सचिवालय अभियान” राबवून प्रत्येक जिल्ह्यात 73 ग्रामपंचायत कार्यालयांची उभारणी करण्यात येणार आहे. ग्रामपंचायतीमध्ये सर्व आधुनिक सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार असून, याठिकाणी पूर्णपणे सौर ऊर्जेचा वापर होण्यासाठीचे नियोजन करण्यात येणार आहे. तर सर्व ग्रामपंचायत कार्यालयांमध्ये वेगवान इंटरनेट सुविधा देण्यात येणार असून संपूर्ण गावाचे नियंत्रण कक्षाची उभारणीही याद्वारे करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
नमो आदिवासी स्मार्ट शाळा अभियान
“नमो आदिवासी स्मार्ट शाळा अभियान” राबवून आदिवासी स्मार्ट शाळांची उभारणी व सुधारणा करण्याबरोबरच 73 विज्ञान केंद्र उभारण्यात येणार आहेत. आधुनिक संसाधनयुक्त शाळांच्या उभारणी, वेगवान इंटरनेट सुविधा, विद्यार्थ्यांना नवीन तंत्रज्ञान व डिजिटल शिक्षण, अंतराळविषयक व विज्ञानातील महत्वाच्या विषयांबाबत मार्गदर्शन, महत्वांच्या शोधांबाबत माहिती, प्रशिक्षण वर्ग, विज्ञान प्रयोगशाळा तसेच अंतराळ दर्शन आदी सुविधा या शाळांच्या माध्यमातुन विद्यार्थ्यांना उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.
हेही वाचा : PM MODI : अतिशय महत्त्वाची आहे विश्वकर्मा योजना, स्किल, ट्रेनिंगसह मिळणार तीन लाखांपर्यंत कर्ज
नमो दिव्यांग शक्ती अभियान
नमो दिव्यांग शक्ती अभियान राबविण्यात येऊन याद्वारे दिव्यांग पुनर्वसन केंद्रांची उभारणी करण्यात येणार आहे. अभियान स्वरुपात दिव्यांगांचे सर्व्हेक्षण व ओळख निश्चित करण्यात येणार आहे. दिव्यांगांना दिव्यांग प्रमाणपत्र, परिवहन व रेल्वे पास आणि इतर सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. दिव्यांगांना आवश्यक साहित्य उपलब्ध करुन देण्याबरोबरच त्यांच्यासाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ देणे, दिव्यांगांना तांत्रिक व व्यावसायिक प्रशिक्षण देणे, दिव्यांगांना व्यवसाय उभारण्यासाठी भांडवल व कर्ज देण्याबरोबरच दिव्यांगांचे व त्यांच्या पालकांचे या अभियानातून समुपदेशन करण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितले.
हेही वाचा : पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त राज्य सरकारची ‘नमो 11 कलमी’ कार्यक्रमाची भेट; सर्व घटकांच्या विकासाचा मानस
नमो क्रीडा मैदान व उद्यान अभियान
नमो क्रीडा मैदान व उद्यान अभियान राबवून यातून सुसज्ज क्रीडा मैदाने व उद्यानांची उभारणी करण्यात येणार आहे. यातून खेळाडूंना मैदानी क्रीडा सुविधा देण्याबरोबरच खेळाडुंचे समुपदेशन करुन त्यांच्या सक्षमीकरणावर भर देण्यात येणार आहे.
नमो शहर सौंदर्यीकरण अभियान
“नमो शहर सौंदर्यीकरण अभियान” राबवुन 73 ठिकाणी शहर सौंदर्यीकरण प्रकल्प राबविण्यात येणार आहेत. शहरातील जीवनमान उंचावण्यासाठी बगीचे, तलाव, रस्ते, पदपथ, दुभाजक, चौक अशा सार्वजनिक ठिकाणी सौंदर्यीकरण करण्यात येणार आहे. लोकसहभागाच्या माध्यमातुन सौंदर्यीकरण टिकून रहावे यासाठीही प्रयत्न करण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितले.
नमो तीर्थस्थळ व गडकिल्ले संरक्षण अभियान
“नमो तीर्थस्थळ व गडकिल्ले संरक्षण अभियान” राबवुन 73 ऐतिहासिक धार्मिक स्थळांची सुधारणा करण्यात येणार आहे. ऐतिहासिक व पुरातन मंदिरांचा जिर्णोद्धार, प्राथमिक सुविधा उपलब्ध करुन देणे, डिजिटल दर्शन, परिसर सुशोभिकरण व स्वच्छता आदी कामे या अभियानातुन करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.