घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रवादळाने भुईसपाट झालेल्या शाळेसाठी विद्यार्थ्यांनी दिले खाऊचे पैसे

वादळाने भुईसपाट झालेल्या शाळेसाठी विद्यार्थ्यांनी दिले खाऊचे पैसे

Subscribe

अकोले : वादळी वारे आणि पावसामुळे सावरकुठे येथील जोगेश्वरी विद्यालय भुईसपाट झाले. मात्र, राजूर, मवेशी विद्यालयामधील विद्यार्थी आणि शिक्षकांनी पुढाकार घेत आर्थिक मदत केली. शिवाय, माजी आमदार वैभव पिचड यांच्या माध्यमातून ग्रामस्थांची बैठक घेऊन शाळेला मदत करून विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ देणार नाही, अशी माहिती माजी सरपंच व एकलव्य एज्युकेशन ट्रस्टच्या अध्यक्षा हेमलता पिचड यांनी सांवरकुठे येथे दिली.

श्री स्वामी समर्थ माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय राजूर, समर्थ माध्यमिक विद्यालय मवेशी येथील विद्यार्थ्यांनी आपल्या खाऊच्या पैशातून विद्यालयाच्या बांधकामासाठी ११ रुपयांची आर्थिक मदत हेमलता पिचड यांच्या हस्ते ग्रामस्थ व विद्यार्थ्यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. यावेळी ग्रामस्थ उपस्थित होते. ७५ व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला सावरकुटे येथील शाळेची इमारत वादळी वार्‍यासह पाऊस असल्याने पडली. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. ही बाब श्री स्वामी समर्थ माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थी व शिक्षकांना समजताच सर्वजण एकत्र आले. विद्यार्थ्यांनी खाऊच्या पैशातून आर्थिक मदत जोगेश्वरी विद्यालयात येत हेमलता पिचड यांच्या हस्ते ग्रामस्थांना दिली. यावेळी संस्थेचे सचिव बापू काळे, मुख्याध्यापक विलास महाले, किरण भागवत, स्वप्नील काळे, अनिल नाईकवाडी, बाळासाहेब हिले, यशवंत राऊत, सचिन पवार, किरण लहामगे उपस्थित होते. प्राचार्या मंजुषा काळे यांनी प्रास्तविक केले.

- Advertisement -

यशवंत राऊत म्हणाले की, मवेशी येथील विद्यालयास २० वर्षांपासून अनुदान नाही. तरी पाच शिक्षक व दोन कर्मचारी बिनपगारी विद्यार्थ्यांना ज्ञानदान देण्याचे काम करत आहेत. अनुदानासाठी इमारत आवश्यक असताना शिक्षकांनी लोकवर्गणीतून साडेचार लाख रुपये किंमतीची इमारत बांधली. या शाळेत शिकणार्‍या विद्यार्थ्यांना त्यांच्या मुलांना या शाळेत पाठवतात असे म्हणाले मुख्याध्यापक सुमंत गीते म्हणाले की, शाळेला वीस वर्षे उलटून गेले मात्र, अजून अनुदान नाही. त्यात शाळा इमारत कोसळली आहे. त्यामुळे मोठे संकट आमच्यासमोर उभे राहिले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -