घरदेश-विदेशNEET : विद्यार्थिंनींना खुल्या मैदानात बदलावे लागले कपडे; काय आहे संपूर्ण प्रकार

NEET : विद्यार्थिंनींना खुल्या मैदानात बदलावे लागले कपडे; काय आहे संपूर्ण प्रकार

Subscribe

या देशभरातील ४ हजार केंद्रावर २ दशलक्षाहून अधिक विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे. या नीट परीक्षेसाठी आलेल्या विद्यार्थिंनीसोबत लज्जास्पद घटना घडली आहे.

मुंबई | महाराष्ट्र (Maharashtra) आणि पश्चिम बंगालमध्ये (West Bengal) नीट परीक्षेदरम्यान (NEET Exam) विद्यार्थ्यींनीसोबत लाजीरवाणा प्रकार घडला आहे. या परीक्षा केंद्रावर ड्रेस कोडमुळे विद्यार्थिंनीची शेवटच्या क्षणी तारबंळ उडाली. यावेळी विद्यार्थिंनी त्यांच्या पालकांसोबत कपडे अदलाबदल करावी लागली. तर काही परीक्षा केंद्रावर विद्यार्थिनींना कुर्ते (kurta) उलटे घालण्यास सांगितले. आणि परीक्षा केंद्रावरील महिला कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यींंना दिलेली वागणूक ही असंवेदनशील होती. हा संपूर्ण प्रकारणाची तक्रार विद्यार्थिनी आणि पालकांनी एनटीएकडे (NTA) केली आहे. यंदा नीट परीक्षा रविवारी (७ मे) पार पडली. या देशभरातील ४ हजार केंद्रावर २ दशलक्षाहून अधिक विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे. या नीट परीक्षेसाठी आलेल्या विद्यार्थिंनीसोबत लज्जास्पद घटना घडली आहे.

नीट परीक्षेसाठी नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) ड्रेस कोड बंधनकारक केला. यावेळी ड्रेस कोड न घातलेल्या विद्यार्थ्यांची परीक्षा केंद्रावर शेवटच्या क्षणी ड्रेससाठी धावपळ करावी लागली. यावेळी विद्यार्थ्यींनी ट्राउझर्स पँट खरेदी करण्यासाठी जवळच्या दुकानात धाव घेतली. या परीक्षा केंद्रावर विद्यार्थींचे अंतर्वस्त्राची तपासणी केल्याचा किळसवाणा प्रकार झाला.

- Advertisement -

नीट परीक्षेदरम्यान नेमके काय झाले 

“सांगली परीक्षा केंद्र (कस्तुरबा वालचंद कॉलेज) येथे विद्यार्थिंनीना कुर्ते काढून उलटे घालण्यास सांगितले जात होते. हा संपूर्ण प्रकार विद्यार्थ्यांनी त्यांच्या पालकांना सांगितला. हा प्रकार अस्वीकार्य असून नीटसारख्या महत्त्वपूर्ण परीक्षेला बसलेल्या विद्यार्थिंनीना अशी वागणूक दिली जाते हे योग्य नाही, या संपूर्ण प्रकाराची तक्रार डॉक्टर दांम्पत्यांनी टीओआयकडे केली आहे.”

- Advertisement -

बंगामधील HMC शिक्षा केंद्र, हिंदमोटर येथील नीट परीक्षा देणाऱ्या एका विद्यार्थ्यिंनीला सोशल मीडियावर आपला अनुभव शेअर करत म्हणाले, “अनेक विद्यार्थिंना पँट बदलण्यास किंवा त्यांचे अंतर्वस्त्र दाखवण्यास सांगितले होते. यावेळी अनेक विद्यार्थिंनींनी त्यांच्या जीन्स त्यांच्या आईच्या लेगिंग्सशी अदलाबदल केली होती. विद्यार्थिनींनी लिहिले की, केंद्राच्या आजूबाजूला कोणतीही आवार किंवा दुकाने नसल्यामुळे मुलींना मुलांसोबत मोकळ्या मैदानात कपडे बदलावे लागले. त्यावेळी त्यांचे पालक त्यांच्या मुलांना घेरले आणि मग विद्यार्थिंनी कपडे बदलतात.”

एनटीए सीसीटीव्ही फुटेज मागवणार

या प्रकरणी एनटीएच्या अधिकाऱ्याने पश्चिम बंगालच्या घटनेप्रकरणी विद्यार्थ्यांना खुल्या खेळाच्या मैदानात कपडे बदलण्यास सांगितले होते हे नाकारले. तर सांगलीतील केंद्राबाबत अधिकाऱ्याने सांगितले की, काही निरिक्षकांना कुर्त्यावर विद्यार्थिंनी काहीतरी लिहिलेल्याचे अढळून आले. त्यामुळे कदाचित परीक्षा केंद्रातील विद्यार्थिंनीना सुरुवातीलाच कर्ते आणि टॉप उलटे घालण्यास सांगितले असावे. आम्ही तपास यंत्रणेकडून निवेदन मागवले असून सीसीटीव्ही फुटेज मागवले आहेत.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -