घरताज्या घडामोडीविद्यार्थ्यांनी निसर्गातून घेतले जीवन कौशल्याचे धडे, वाचन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

विद्यार्थ्यांनी निसर्गातून घेतले जीवन कौशल्याचे धडे, वाचन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

Subscribe

मुंबई : “वृक्षवल्ली आम्हा सोयरी – वनचरे” या संत तुकारामांच्या अभंगातील ओवीचा हुबेहूब प्रत्यय विद्यार्थी व त्यांच्या पालकांना नुकताच आला. निमित्त होते मध्य मुंबई मराठी विज्ञान संघाने आयोजित केलेल्या निसर्ग वाचन स्पर्धेचे.
मध्य मुंबई मराठी विज्ञान संघाने कै. डॉ. सुरेंद्र जयवंत यांच्या ९० व्या जयंतीनिमित्त धारावी येथील महाराष्ट्र निसर्ग उद्यानात पाचवी ते सातवीतील शालेय विद्यार्थ्यांसाठी निसर्ग वाचन स्पर्धा नुकतीच पार पडली.

या स्पर्धेत सरस्वती विद्यालय (मराठी आणि इंग्रजी माध्यम), बालमोहन विद्यामंदिर, प्रबोधन कुर्ला आणि उदयाचल (विक्रोळी) या शाळांमधील विद्यार्थ्यांनी व सहभाग घेतला. त्याचप्रमाणे, निसर्ग संवादक सरिता आचरेकर, नितेश निकम, वर्षा कोळी आणि सत्यम गुप्ता यांनी विद्यार्थ्यांची आणि त्यांच्या पालकांची कार्यशाळा घेतली. यानंतर कार्यशाळेत दिलेल्या माहितीवर आधारीत विद्यार्थ्यांची परिक्षा घेण्यात आली.

- Advertisement -

निसर्गातील पक्षी, फुलपाखरे, झाडे, पाने, फळ, फुले माणसांशी कशाप्रकारे संवाद साधतात.त्यांचं जीवनचक्र, अन्नसाखळी या सर्व बाबींवर सखोल आणि अभ्यासपूर्ण माहिती विद्यार्थी व त्यांच्या पालकांना या स्पर्धेच्या निमित्ताने अनुभवता आली. मुंबईच्या मध्यवस्तीत निसर्गाचं किती मोठे वरदान लाभले आहे, याचा प्रत्यय सर्वांना यानिमित्ताने आला.

हा संपूर्ण कार्यक्रम संस्थेचे माजी कोषाध्यक्ष जगदीश म्हात्रे यांनी प्रायोजित केला होता. जनमानसात वैज्ञानिक दृष्टी निर्माण व्हावी म्हणून मध्यमुंबई विज्ञान संघ १९७१ सालापासून व्याख्याने, कार्यशाळा व इतर उपक्रम आयोजित करीत आहे. संस्थेचे कार्यवाह निर्मला सुळे व अमेय परब आणि कार्यकर्ते तुषार देसाई व मंदार मनवाडकर यांनी कार्यक्रमाचे अतिशय उत्कृष्ट नियोजन केले.

- Advertisement -

महाराष्ट्र निसर्ग उद्यानाचे प्रकल्प अधिकारी युवराज पाटील यांनी हा कार्यक्रम यशस्वी व्हावा यासाठी विशेष प्रयत्न केले. सर्व विद्यार्थी व पालकांनी उत्स्फूर्तपणे संस्थेचे आभार मानले. विशेष म्हणजे या पुढील उपक्रमातही सहभागी होण्याची इच्छा पालक व विद्यार्थी यांनी यावेळी व्यक्त केली.


हेही वाचा : शालेय बसबाबत पालकांनो सावधान, मद्यधुंद अवस्थेत चालक चालवताहेत बस


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -