घरमहाराष्ट्रStudents Unfit : शाळेतील मुलं 'अनफिट'; देशातील विद्यार्थ्यांच्या आरोग्याबाबत अहवाल समोर

Students Unfit : शाळेतील मुलं ‘अनफिट’; देशातील विद्यार्थ्यांच्या आरोग्याबाबत अहवाल समोर

Subscribe

मुंबई : ‘स्पोर्ट्झ व्हिलेज’ या संस्थेने केलेल्या 12 व्या वार्षिक आरोग्य सर्वेक्षणाचे निष्कर्ष जाहीर करण्यात आले आहेत. या सर्वेक्षणानुसार देशातील मुलांच्या आरोग्याबाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. शाळेतील मुलं अनफिट असून त्यांच्या आरोग्याबाबत अनेक समस्या आहेत. (Students Unfit School children unfit A report on the health of students in the country)

‘एज्युस्पोर्ट्स इन स्कूल फिजिकल एज्युकेशन कॅम्प’ या उपक्रमाद्वारे ‘स्पोर्ट्झ व्हिलेज’ या संस्थेने 12 व्या वार्षिक आरोग्य सर्वेक्षणाचे निष्कर्ष जाहीर केले आहेत. देशातील 250 शहरं आणि गावांमधील विविध शाळांमधील 7 ते 17 वर्षे वयोगटांतील 73 हजारांपेक्षा अधिक मुलांचा सर्व्हेक्षणात समावेश करण्यात आला होता. या सर्व्हेक्षणात शाळेतील विद्यार्थ्यांची शारीरिक तंदुरुस्ती खूपच खालावल्याचे दिसून आले. एकंदरीत विद्यार्थ्यांचे आरोग्य सुदृढ नाही.

- Advertisement -

हेही वाचा – Jalgaon : पैशांच्या देवाणघेवाणीतून आधी राडा नंतर तुफान दगडफेक; परिसराला छावणीचं स्वरुप

देशभरातील शाळांमधील मुलांचे शरीर बीएमआय, ‘एरोबिक’ क्षमता, लवचिकता, शरीराच्या वरच्या आणि खालच्या भागाची ताकद अशा विविध निकषांच्या आधारे शारीरिक तंदुरुस्ती तपासण्यात आली. विद्यार्थ्यांमध्ये तंदुरूस्ती आणि चांगल्या आरोग्याचा अभाव असल्याचं समोर आले असून पाच पैकी दोन मुलांचे बॉडी मास इंडेक्स म्हणजेच शरीर वस्तुमान निर्देशांक योग्य नसल्याचे समजते. चार पैकी तीन मुलांमध्ये अपेक्षित ‘एरोबिक’ क्षमता नाही अशीही माहिती समोर येत आहे. तसेच पाचपैकी तीन मुलांमध्ये शरीराच्या वरच्या आणि खालच्या भागाची ताकदही पुरेशी नसल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे.

- Advertisement -

शिक्षणाचे तास असणाऱ्या शाळांमधील मुलांची तंदुरुस्ती चांगली

निरोगी ‘बीएमआय’ पातळी असलेल्या मुलींची टक्केवारी मुलांच्या तुलनेत जास्त आहे. लवचिकता आणि शरीराच्या वरच्या भागातील ताकद या बाबतीत मुली मुलांच्या पुढे, तर एरोबिक क्षमता आणि शरीराच्या खालच्या भागाची ताकद याबाबतीत मुली मुलांपेक्षा मागे असल्याचे लक्षात आले आहे. दर आठवड्याला दोनपेक्षा जास्त शारीरिक शिक्षणाचे तास असणाऱ्या शाळांमधील मुलांची तंदुरुस्ती अधिक चांगली असल्याचे दिसून आले आहे.

हेही वाचा – Maharashtra Politics : अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसला ‘या’ व्यक्तीवरही शाश्वती नाही

शिक्षणाचा अविभाज्य भाग म्हणून खेळाकडे पाहावे 

‘स्पोर्ट्झ व्हिलेज’चे मुख्य कार्यकारी अधिकारी सौमिल मजमुदार यांनी सर्वेक्षणाबाबत माहिती देताना सांगितले की, शाळा प्रशासन आणि पालकांच्या दृष्टीने अभ्यासापेक्षा शारीरिक शिक्षणाचे महत्त्व कमी असल्याचे पहायला मिळते. विद्यार्थ्यांना शारीरिक शिक्षणाचे तास जास्त मिळत नसल्याने त्यांना खेळण्यासाठी आणि शारीरिक व्यायामासाठी कमी वेळ मिळतो. त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर दिसून येतो. त्यामुळे शिक्षणाचा अविभाज्य भाग म्हणून येत्या काळात खेळाकडे पाहणे गरजेचे असल्याचे सौमिल मजमुदार यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -