घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रविद्यार्थी बनणार गोदा प्रदूषणमुक्तीचे दूत

विद्यार्थी बनणार गोदा प्रदूषणमुक्तीचे दूत

Subscribe

नाशिक : गोदावरी नदी प्रदूषण मुक्त ठेवण्यासाठी व नद्यांचे प्रदूषण टाळण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांच्या मदतीने जनजागृती करण्यात यावी. जिल्हा परिषद शाळा व महानगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना एकत्र करुन शाळेच्या प्रांगणात मानवी साखळीचे आयोजन करण्यात यावे. तसेच विद्यार्थ्यांच्या मदतीने पथनाट्यांचे सादरीकरण त्यांच्याच शाळेत किंवा आजुबाजूच्या परिसरात करण्यात यावे, जेणेकरुन गोदावरी प्रदूषण मुक्त ठेवण्याबाबतचा संदेश समाजपर्यंत पोहचविण्यास मदत होईल, असे आवाहन विभागीय माहिती कार्यालयाचे उपसंचालक तथा गोदावरी प्रदूषण नियंत्रण प्रचार व प्रसिद्धी स्तरावरील उपसमितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर इगवे यांनी केले.

विभागीय माहिती कार्यालय, नाशिक येथे गोदावरी प्रदूषण नियंत्रण प्रचार व प्रसिद्धी स्तरावरील उपसमितीची बैठक झाली यावेळी इगवे म्हणाले की, गोदावरी प्रदूषण रोखण्यासाठी शाळा प्रभावी माध्यम आहे. त्यामुळे सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून, चित्रकला स्पर्धांचे आयोजन करुन जलप्रदूषण रोखण्यासाठी जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात यावे. परिवहन विभागाच्या जिल्हा रस्ता सुरक्षा समिती व परिवहन प्राधिकरण समितीच्या बैठकीत चर्चा करुन रिक्षांवर गोदावरी प्रदूषणमुक्तीचे संदेश लावावेत, तसेच आकाशवाणीद्वारेही प्रबोधन करावे, असे इगवे यांनी सांगितले. यावेळी पालिकेच्या गोदावरी संवर्धन कक्षाचे उपायुक्त विजयकुमार मुंडे, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी वासुदेव भगत, आकाशवाणीचे प्रमुख शैलेश माळोदे, अशासकीय सदस्य निशिकांत पगारे आदी मान्यवर उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -