घरताज्या घडामोडीराजकीय नेत्यांची स्टंटबाजी की इतिहासाचे विकृतीकरण?

राजकीय नेत्यांची स्टंटबाजी की इतिहासाचे विकृतीकरण?

Subscribe

काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात दाखल झाली आहे. महाराष्ट्रात भारत जोडो यात्रा आल्यानंतर मोठ्या घडामोडी घडायला सुरुवात झाली आहे. यामध्ये संभाजीराजेंची पत्रकार परिषद त्यानंतर राष्ट्रवादीची आक्रमक भूमिका आणि यामध्ये मनसेनंसुद्धा उडी घेतली.

राज्यात गेल्या चार दिवसांपासून हायव्होल्टेज घडामोडी घडत आहेत. एकीकडे काँग्रेसची भारत जोडो यात्रा शांततेत पुढे सरकते तर दुसरीकडे मुंबईत मोठ्या प्रामाणात राडा सुरु आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड सायलेंट होते ते आता व्हायलेंट झाले आहेत. याचे कारण म्हणजे हर हर महादेव चित्रपटाला केलेला विरोध, माजी खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी हर हर महादेव या चित्रपटात इतिहासाची मोडतोड करुन दाखवले असल्याचा आरोप चित्रपट न पाहता केला. यानंतर संभाजीराजेंच्या भूमिकेला अनेकांनी समर्थन दिले त्यात राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीवर होती. १० दिवसांपासून सुरु असलेल्या चित्रपटावर संभाजीराजेंनी विरोध दर्शवला आणि जितेंद्र आव्हाडांनी ठाण्यातील मॉलमध्ये चित्रपटाचा शो बंद पाडला. यावेळी प्रेक्षकांसोबत हाणामारी केली असल्याचे व्हिडीओसुद्धा समोर आले.

2003 साली जेम्स लेन प्रकरण आले. जेम्स लेनच्या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पितृत्वावर शंका निर्माण करण्यात आली होती. याला आम्ही विरोध केला तेव्हा त्यांच्याबाजूनं एकच माणूस उभा राहिला त्यांचे नाव म्हणजे राज ठाकरे आहे. त्यानंतर बाबासाहेब पुरंदरे यांच्या पुस्तकात किती चुकीचं लिखाण झालंय ते उदाहरणासह सांगितले होते. त्याचे समर्थनसुद्धा राज ठाकरे यांनी केले. हर हर महादेव या चित्रपटासारखा विकृत चित्रपट या महाराष्ट्रात मी कधीही पाहिला नाही असे जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले.

- Advertisement -

हर हर महादेव या चित्रपटामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आवाज दिला आहे. तर चित्रपटात छत्रपती उदयनराजे भोसले आणि युवराज संभाजीराजे छत्रपती यांचे विशेष आभार मानले आहेत. परंतु चित्रपटाविषयी आपल्याला काही कल्पना नव्हती तसेच या चित्रपटात जो इतिहास दाखवण्यात आलाय त्याची मोडतोड केल्याचा आरोप संभाजीराजेंनी केला आहे. मात्र संभाजीराजेंनी हर हर महादेव हा चित्रपटच पाहिला नाही. इतिहासाची मोडतोड केली तर खपवून घेणार नाही असा इशाराच संभाजीराजे यांनी दिला आहे.

संभाजीराजेंच्या इशाऱ्यानंतर राष्ट्रवादीनेसुद्धा चित्रपटाला विरोध केलाय तर मनसेचा मात्र पाठींबा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी मॉलमध्ये सुरु असलेला चित्रपट बंद पाडला. आव्हाड यांनी चित्रपट गृहात राडा केल्यानंतर पुढच्या १० मिनिटांमध्ये मनसे ठाणे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव त्या ठिकाणी दाखल झाले. त्यांनी पुन्हा चित्रपट सुरु केला. यामध्ये दोन्ही नेत्यांनी केलेली स्टंटबाजी महाराष्ट्राने पाहिली आहे. एकून ४ दिवसांच्या या घडामोडींमध्ये आव्हाडांना जेल आणि नंतर बेलसुद्धा देण्यात आली.

- Advertisement -

संभाजीराजे आरोपानंतर बॅकफूटवर

हर हर महादेव चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी चुकीचा इतिहास दाखवण्यात आला असल्याचा आरोप युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी केला. यानंतर राजेंची स्वराज्य संघटना आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडूनसुद्धा विरोध करण्यात आला होता. संभाजीराजे यांनी पत्रकार परिषद घेऊन आरोप केले यावेळी असा प्रकार खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा दिला. परंतु इशाऱ्यानंतर राजे बॅकफूटवर गेले असून त्यांच्याकडून अद्याप पुन्हा प्रतिक्रिया आली नाही. विरोध दर्शवून संभाजीराजेंनी मौन का धारण केले? असा प्रश्न उपस्थित होत आहे. राजेंच्या इशाऱ्यानंतर राष्ट्रवादी आणि मनसेमध्ये जुंपल्याचे पाहायला मिळत असताना संभाजीराजेंची प्रतिक्रिया अद्याप आली नसल्यामुळे राजकीय चर्चा सुरु झाल्या आहेत.

भारत जोडो यात्रेला मोठं जनसमर्थन

काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात दाखल झाली आहे. महाराष्ट्रात भारत जोडो यात्रा आल्यानंतर मोठ्या घडामोडी घडायला सुरुवात झाली आहे. यामध्ये संभाजीराजेंची पत्रकार परिषद त्यानंतर राष्ट्रवादीची आक्रमक भूमिका आणि यामध्ये मनसेनंसुद्धा उडी घेतली. हे सर्व सुरु असताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची जेलमधून सुटका यामुळे राजकीय स्टंटबाजी सुरु असल्याचे दिसत आहे. यापूर्वीसुद्धा अनेक चित्रपट आले मग तेव्हा का आक्षेप घेण्यात आला नाही. नेमका आताच का घेण्यात आला असा प्रश्न निर्माण झाला आहे. या सर्वामागे नक्की राजकीय नेत्यांची स्टंटबाजी आहे की, इतिहासाचे विकृतीकरण हे कारण आहे.


हेही वाचा : कौन किसके शादी मे जा रहा है, लोकांना माहितीय; मुख्यमंत्री शिंदेंचा आव्हाडांना टोला

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -