Sunday, June 11, 2023
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र कामाची बातमी : आता दस्त नोंदणीसाठी सुटी घेण्याची गरज नाही, शनिवार-रविवार सुरु...

कामाची बातमी : आता दस्त नोंदणीसाठी सुटी घेण्याची गरज नाही, शनिवार-रविवार सुरु राहणार दुय्यम निबंधक कार्यालय

Subscribe

मुंबई – सामान्य जनतेच्या सोयीसाठी जिल्हा मुख्यालय आणि महानगरपालिका क्षेत्रातील दुय्यम निबंधक कार्यालये (Offices of the Sub-Registrar) शनिवार आणि रविवार या सुट्टीच्या दिवशीही सुरू राहणार आहेत, त्यामुळे नागरिकांना दस्त नोंदणीत (Registration of Deeds) अडचण होणार नाही. यापुढे नॉनस्टॉप दस्त नोंदणी होणार असल्याचे राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radha Krushna Vikhe Patil) यांनी स्पष्ट केले आहे. (Sub-Registrar offices will continue to function on holidays as well)

खरेदी -विक्री व्यवहारामध्ये वाढ होत असल्याने नागरिकांना त्यांच्या कामाच्या वेळेत दस्त नोंदणी करणे शक्य होत नाही, तसेच दुय्यम निबंधक कार्यालयात नागरिकांची वाढती गर्दी लक्षात घेता नागरिकांना सुट्टीच्या दिवशीही दस्त नोंदणी करता यावी, या दृष्टिकोनातून हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई विभागातील (Mumbai Division) (मुंबई शहर, उपनगर), कोकण विभागातील (Konkan Division) (ठाणे शहर, ठाणे ग्रामीण, पालघर, रायगड अलिबाग), पुणे विभागातील (Pune Division) ( सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर), अमरावती विभागातील (Amravati Division) (अकोला, अमरावती), नागपूर विभागातील (Nagpur Division) (नागपूर), लातूर विभागातील (Latur Division) ( लातूर, नांदेड), नाशिक विभागातील (Nashik Division) (नाशिक, जळगाव), औरंगाबाद विभागातील (Aurangabad Division) (औरंगाबाद) जिल्हा मुख्यालय आणि महानगरपालिका क्षेत्रातील दुय्यम निबंधक कार्यालये शनिवार आणि रविवार या सुट्टीच्या दिवशीही सुरू राहणार आहेत. नागरिकांनी या सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले आहे.

- Advertisement -

महसूल विभाग अधिक जनताभिमुख करण्यासाठी राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विविध धोरणात्मक निर्णय घेतले आहे. सलोखा योजना, ६०० रुपये ब्रास वाळू उपलब्ध करून देणारे नवीन वाळू धोरण, जमीन मोजणी अशा निर्णयामुळे जनतेला महसूल विभागाच्या सेवा अधिक सुलभतेने मिळत असल्याचा दावा महसूल विभागाकडून करण्यात आला आहे.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -