Weather Update : राज्यात मॉन्सूनचे ‘कमबॅक’, हवामान विभागाची माहिती

weather alert normall rainfall next 3 days in all maharashtra says imd
Weather Forecast : पुढील ३ दिवस राज्यात पावसाचा जोर कायम! हवामान विभागाचा अलर्ट

काही दिवसांपासून गायब झालेले मॉन्सूनचे ढग राज्यभरात पुन्हा सक्रिय होणार आहेत. कारण पुढील चार ते पाच दिवसांत राज्यात मान्सूनचे पुनरागमन होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाच्या मुंबई प्रादेशिक कार्यालयाने जाहीर केला आहे. तर ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ के.एस. होसाळीकर यांनी राज्यात चार ते पाच दिवसांत हकला ते मध्यम पाऊस पडेल असा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे उन्हाने त्रस्त झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळणार आहे. संपूर्ण राज्यभरात हकला आणि मध्यम स्वरुपाचा पाऊस पडणार असल्याचेही हवामान विभागाने जाहीर केले.

प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबईने दिलेल्या पूर्वानुमान प्रमाणे, येत्या ४,५ दिवसात राज्यात हलका ते मध्यम पावसाची शक्यता अशी माहिती के.एस. होसाळीकर यांनी ट्वीटच्या माध्यमातून दिली आहे.

पावसाच्या विश्रांतीमुळे मराठवाडा, विदर्भात तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत होता. यात चंद्रपूरात सर्वाधिक तापमानची नोंद झाली. यातच पुन्हा पावसाला सुरुवात झाल्या गरमीने हैराण झालेल्या नागरिकांना काहीप्रमाणात दिलासा मिळणार आहे. कोकण, मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्रसह अनेक भागांत पावसाची हीच स्थिती असणार आहे. यामुळे रखडलेल्या शेतीच्या कामांनाही पुन्हा वेग येईल. मात्र या वातावरण बदलांचा परिणाम आता पिकांवर होऊ लागला आहे. पंधरा दिवसांपूर्वी शेतकऱ्यांनी पेरणी केली मात्र पावसाने उसंती घेतल्याने पिकांना धोका निर्माण झाला आहे