घरताज्या घडामोडीभोंगा कमळाला किती त्रास देतोय ते आगामी काळात समजेल, सुभाष देसाईंची बोचरी...

भोंगा कमळाला किती त्रास देतोय ते आगामी काळात समजेल, सुभाष देसाईंची बोचरी टीका

Subscribe

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज औरंगाबादला जाहीर सभा होणार आहे. तसेच आज महाराष्ट्र दिन सुद्धा आहे. मात्र, राज्यात भोंग्यावरून सुरू असलेल्या विषयावर राज ठाकरे काय बोलणार किंवा त्यांची भुमिका काय असणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान, भोंगा कमळाला किती त्रास देतोय ते आगामी काळात समजेल, अशी बोचरी टीका सुभाष देसाई यांनी राज ठाकरे यांच्यावर केली आहे. महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने सुभाष देसाई औरंगाबादमध्ये आले होते, त्यावेळी त्यांनी वक्तव्य केलं.

भोंगा कमळाला किती त्रास देतं हे येणाऱ्या काळात समजेल

हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी शहराला औरंगाबादपासून संभाजीनगर अशी एकप्रकारची मुक्तता दिली आहे. संभाजीनगरवासीय एकप्रकारे ती आठवण जतन करत आहेत. शिवसेनेचं येथील हिंदुत्वाचं जे नातं आहे ते अभेद्य आहे. ते पुढेही कायम राहिल यात शंका नाही, असं सुभाष देसाई म्हणाले.

- Advertisement -

आधी मराठी मराठी केलं, आता भोंगा भोंगा करत आहेत. त्यामुळे भोंगा आणि कमळच नातं झालेलं आहे. भोंगा कमळाला किती त्रास देतं हे येणाऱ्या काळात समजेल. महाराष्ट्रानं अशा अनेक सुपारी सभा पाहिल्या आहेत. त्यामुळे हा विषय अजून किती दिवस टिकेल हे जनता पाहण्यास उत्सुक आहे, असं स्पष्टीकरण सुद्धा देसाईंनी दिलंय.

आतापर्यंत अनेक संकट आली. त्यामध्ये पोलीस प्रशासनानं चांगली कामगिरी बजावली आणि जनतेला संकटातून बाहेर येण्यास वेळोवेळी मदतही केली आहे. काळजी घेणं हे पोलिसांचं कर्तव्य आहे. त्यामुळे त्यांनी काळजी घेतलीये. औरंगाबादच्या शांततेला कुठेही गालबोट लागणार नाही. जनता सूज्ञ आहे. त्यामुळे कोणीही किती चिथावणी दिली तरी आपली डोकी भडकवून घेणार नाही, याची खात्री आहे. जे बंधुभावाचं नातं कायम ठेवलंय त्याचं जतन करायचं आहे, असं देसाई म्हणाले.

- Advertisement -

बाबरी मशिद पाडण्याची जबाबदारी सर्वप्रथम शिवसेनेने घेतली

भाजप, बजरंग दल, विश्व हिंदू परिषद हे सर्व घडत असताना बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितलं की, बाबरी मशिद शिवसैनिकांनी पाडली असेल तर याचा मला अभिमान आहे. बाबरी मशिद पाडण्याची जबाबदारी सर्वप्रथम शिवसेनेने घेतली होती. त्यामुळे हिंदुत्ववादी कोण आहे हे शिवसेनेला सांगायची गरज नाही, असं देसाई म्हणाले.


हेही वाचा : शिवसेनेची आक्रमकता हे फक्त शब्दांचे बुडबुडे, संदीप देशपांडेंचा टोला


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -