घरताज्या घडामोडीऔरंगाबाद मनसे पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेस, सुभाष देसाई म्हणतात मनसे गळकं घर

औरंगाबाद मनसे पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेस, सुभाष देसाई म्हणतात मनसे गळकं घर

Subscribe

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आणि महानगरपालिका, नगरपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय नेते मंडळी पक्षबदल करत आहेत. निवडणुकांसाठी सगळ्याच राजकीय पक्षांकडून तयारी सुरु करण्यात आली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे औरंगाबादच्या दौऱ्यावर जाणार आहेत त्यापुर्वीच मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. १४ डिसेंबर २०२१ रोजी राज ठाकरे औरंगाबाद दौऱ्यावर आहेत त्यापुर्वीच पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे चर्चा सुरु झाल्या आहेत. पक्षप्रवेशादरम्यान सुभाष देसाई यांनी मनसेवर गळकी लागलेलं घर अशी टीका केली आहे.

औरंगाबादमधील मनसेच्या ७ ते ८ पदाधिकाऱ्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या दौऱ्यापुर्वीच शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिवसेना नेते आणि पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला आहे. सुभाष देसाई यांनी यावेळी मनसेवर घणाघात केला आहे. मनसेचं घर गळक असल्यामुळे तेथील पदाधिकारी बाहेर पडत आहेत. तर शिवसेनेचा वाडा चिरेबंदी आहे. एकदा शिवसेनेत प्रवेश केल्यावर इथून कोणी बाहेर पडत नाही. कारण बाहेर जाण्यासाठी कोणी दरवाजा उघडत नाही असे सुभाष देसाई यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

या पदाधिकाऱ्यांनी बांधले शिवबंधन

मनसेकडूनही निवडणुकांसाठी जोरदार तयारी सुरु केली आहे. यासाठी राज ठाकरेसुद्धा औरंगाबाद दौऱ्यावर जाणार आहेत. त्यापुर्वीच मनसेच्या काही पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. कन्नड माजी जि.प.सदस्य शैलेश क्षीरसागर, अविराज निकम, मनसे माजी शहराध्यक्ष राजेश थोरात, मनसे विद्यार्थी सेना शहराध्यक्ष सतीश फुलारे, मोहंमद साजिक, जुनेद अख्तर, बाळासाहेब औताडे, समाजिक कार्यकर्त्या शकिल पठाण, शंकर कदम, माजी नगरसेवक कांतीलाल निरपगारे, अक्षय म्हस्के या पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.

औरंगाबादमध्ये महापालिका निवडणुकीचे जोरदार वारे वाहू लागले आहेत. सर्वच राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणी सुरु करण्यात आली आहे. औरंगाबादमध्ये मनसेचे फार अस्तित्व राहिले नाही. यासाठी मनसेकडून मोर्चेबांधणी सुरु करण्यात आली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्वतः जातीने लक्ष घातले आहे. राज ठाकरे आता औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. राज ठाकरे पदाधिकाऱ्यांची आणि शाखा अध्यक्षांशी चर्चा करतील. मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे आता मनसेला मोठा धक्का बसला आहे.

- Advertisement -

हेही वाचा : शिवसेना एकटीच श्रेय घेत असेल तर वेगळा विचार करावा लागेल; आव्हाड यांचा इशारा


 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -