घरमहाराष्ट्रसुभाष देसाई डिसेंबर 2022 पर्यंत उद्योगमंत्री?

सुभाष देसाई डिसेंबर 2022 पर्यंत उद्योगमंत्री?

Subscribe

विधान परिषदेसाठी शिवसेनेने सचिन अहिर आणि आमशा पाडवी यांची उमेदवारी जाहीर केली आहे. उद्योग मंत्री सुभाष देसाई यांना विधान परिषदेची उमेदवारी मिळालेली नाही. त्यामुळे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्याकडे विधानसभा किंवा विधानपरिषदेवर निवडणून जाण्यासाठी डिसेंबर 2022 पर्यंत कालावधी आहे. जर उद्योग मंत्री सुभाष देसाई यांचा मुख्यंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा घेतला तर उद्योग मंत्री पदासाठी सुनील राऊत, सुनील प्रभू आणि रवींद्र वायकर यांनी लॉबिंग सुरू केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. मात्र, मुख्यमंत्री त्यांचा आताच राजीनाम घेणार की त्यांना पुन्हा विधान परिषद किंवा विधान सभेसाठी संधी देणार हे पाहाणे महत्वाचे ठरणार आहे.

सहा महिन्यात निवडून जाणे बंधनकारक –

- Advertisement -

मंत्रीपद मिळाल्यानंतर सहा महिन्यात विधानसभा किंवा विधान परिषदेवर निवडून जाणे बंधनकारक असते. मात्र, सद्य परिस्थितीमध्ये उद्योग मंत्री सुभाष देसाई आणि जेष्ठ नेते दिवाकर रावते यांचा विधान परिषदेच्या सदस्य पदाचा कालावधी संपला आहे. त्यांच्या जागी शिवसेनेने सचिन अहिर आणि आमशा पाडवी यांना विधान परिषदेची उमेदवारी दिली आहे त्यामुळे आगामी सहा महिन्यात सुभाष देसाई यांना विधानसभा किंवा विधानपरिषदेवर निवडून येणे बंधनकारक आहे.

लटकेंच्या जागेवर संधी देणार?

- Advertisement -

शिवसेनेचे अंधेरी पूर्व विधानसभा मतदार संघाचे आमदार रमेश लटके यांचे नुकतेच निधन झाले. त्या जागेसाठी महापालिकेसोबत निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. त्या जागेवर उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्या नावाचा विचार होण्याची शक्यता आहे. पण, 2019 मध्ये अपक्ष उमेदवार आणि भाजपचे माजी नगरसेवक नुरजी पटेल यांनी रमेश लटके यांच्या विरोधात चांगला लढा दिली होता. त्यावेळी लटके यांनी 20 हजार मतांनी विजय मिळवला होता. मात्र, सुभाष देसाई हे गोरगाव विधानसभा मतदार संघातील आहेत. त्यामुळे त्याजागेवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांना संधी देणार का हे पाहाणे महत्वाचे आहे.

मंत्री मंडळ विस्तार –

राज्य मंत्रीमंडळाचा विस्तार महापालिका निवडणुकीनंतर होण्याची शक्यता आहे. या विस्तारात शिवसेनेकडे वनमंत्री पद आणि जर सुभाष देसाई यांचा राजीनामा उद्धव ठाकरे यांनी घेतला तर उद्योग मंत्री पद रिक्त होणार आहे. या दोन मंत्री पदासाठी मुंबईसह इतर महाराष्ट्रातील नेते लॉबिंग करत आहेत. मात्र, उद्योग मंत्री पदाचा मुख्यमंत्र्यांनी सुभाष देसाईं यांच्याकडून राजीनामा घेतला तर त्याजागेसाठी मंत्री मंडळ विस्तारात सुनील राऊत, सुनील प्रभू आणि रवींद्र वायकर यांनी लॉबिंग सुरू केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

सुभाष देसाई काय म्हणाले –

मी विधान परिषद निवडणुकीतून माघार घेण्याचा प्रश्नच नाही. मी उद्धव ठाकरे यांच्यासोबत बसून उमेदवार ठरवतो. हे उमेदवार नेते मंडळी ठरवत असतात आणि मी त्या प्रक्रियेत आहे. उमेदवार ठरवण्याच्या प्रक्रियेत मीच असल्याने विधान परिषद निवडणूक न लढवणं हा माझा निर्णय आहे. मी यावेळी विधान परिषद निवडणूक लढणार नाही, असे उद्योग मंत्री सुभाष देसाई म्हणाले. त्यांनी पुढे शिवसेनेच्या दोन जागा आहेत. या दोन जागांवर शिवसेना दोन उमेदवार देत आहे. कोण निवडून येतो हा विषय माझ्यासाठी गौण आहे. शिवसैनिक निवडून येतो आहे हा मोठा समाधानाचा विषय आहे, अशी प्रतिक्रीया दिली आहे.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -