घरताज्या घडामोडीवाहतूक कोंडीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सायकल चालवण्यात पुढाकार घ्यावा, सुभाष तळेकरांचं आवाहन

वाहतूक कोंडीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सायकल चालवण्यात पुढाकार घ्यावा, सुभाष तळेकरांचं आवाहन

Subscribe

मुंबई: सायकल चालविणे आरोग्यासमवेतच पर्यावरणीयदृष्ट्याही हितकारक असून मुंबई शहरात सायकल संस्कृती रुजविण्यासाठी सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक संघटना आणि वैयक्तिकरित्याही सगळ्यांनी पुढाकार घेतला पाहिजे, असे आवाहन मुंबई डबेवाला असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी केले. सायकल चालवण्याचे महत्व किती आहे हे विद्यार्थांशी संवाद साधत असताना ते बोलत होते.

तरूण मुलांमध्ये सायकलिंग बद्दल प्रेम वाढत आहे ही चांगली बाब आहे. परंतु सायकलसाठी आवश्यक पायाभूत सुविधा उभारण्यासाठी लागणारी राजकीय इच्छाशक्ती आपणाकडे निर्माण झाली पाहिजे, असेही ते पुढे म्हणाले.

- Advertisement -

सुभाष तळेकर यांनी नमूद केले की, जवळपास दोन शतकांपासून आपण सायकलीचा वाहतुकीसाठी वापर करत आहोत. सायकलीच्या वापराबाबत जनजागृती निर्माण झाली पाहीजे. हल्ली कमी अंतराच्या प्रवासासाठीही दुचाकी आणि चारचाकींचा सर्रास वापर केला जातो. त्यामुळे प्रदूषण, तापमानात प्रचंड प्रमाणात वाढ होत आहे. मोठ्या प्रमाणात वहातुक कोंडी होते आहे हे सर्व थांबविण्यासाठी शक्य तेवढ्या जास्त प्रमाणात प्रवासासाठी सायकलचा वापर करणे, हाच एकमेव पर्याय असू शकतो.

आंतराष्ट्रीय पातळीवर नावलौकिक मिळवलेले मुंबईचे डबेवाले गेली कित्येक वर्ष मुंबईत डबे पोहचवण्याची सेवा लोकल आणी सायकलच्या माध्यमातून देत आहेत. खिशाला परवडेल अशा किमतीत उपलब्ध असलेली सायकल त्यांच्यासाठी अत्यंत उपयुक्त असे वाहन आहे. इंधनाचे दर गगनाला भिडले आहेत परंतु सायकलला इंधन लागत नसल्यामुळे इंधन वाढीची चिंता येथे नाही. सायकल पर्यावरणपूरक असल्यामुळे तिच्यामुळे प्रदूषणालाही आळा बसतो, सायकलचा मेन्टनेस खर्च जवळ जवळ शुन्य आहे. सायकल चालवण्यासाठी आर.टी.ओ. विभागाचा परवाना ही लागत नाही. मुंबईतील वहातुक कोडींत सायकल कधीच अडकत नाही, असेही ते पुढे म्हणाले.

- Advertisement -

डबेवाले संघटनचे नेते मॅनेजमेंट गुरू कै. गंगाराम तळेकर हे आपल्या व्याख्याना मध्ये नेहमी दाखला देत असत. डबेवाल्यांना “सिक्स सिग्मा” मिळाला हे खरे आहे पण त्यातील दोन सिंग्मा मुंबईच्या लोकलला दिले पाहीजे कारण मुंबईत दोन मिनिटांनी एक लोकल धावते आणी वेळेवर धावते. म्हंणुन डबेवाले वेळेवर सेवा देऊ शकतात. दोन सिग्मा सायकलला दिले पाहीजे कारण सायकल आमचे सर्वात जास्त उपयुक्त वहान आहे जे मुंबईतील वहातुक कोंडीत ती आम्हाला अडकू देत नाही. दोन सिग्मा डबेवाल्यांना दिले होते कारण चांगल्या टिमवर्क मुळे त्यांनी हे यश मिळवले. या वरून सायकलचे महत्व डबेवांल्याच्या व्यवसायात किती आहे हे कळते.

व्यवसायानिमित्त डबेवाल्यांना दररोज अनेक किमीचे अंतर सायकलनेच गाठावे लागते. सायकल चालवण्याच्या या रोजच्या सवयीमुळे डबेवाले अत्यंत तंदुरुस्त असून रक्तदाब, मधुमेह, हदयविकारासारखे आजारही त्यांच्यापासून दूर आहेत. त्यामुळे सत्तरी पार केलेले डबेवालेदेखील सायकलच्या माध्यमातून डबे पोहचवण्याचे काम अद्यापही करत आहेत. दररोज सायकल चालवून सर्व आजारांना दूर ठेवा आणि तंदुरुस्त राहा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.


हेही वाचा : राहुल गांधींविरोधातील मनसेच्या भूमिकेचे रणजित सावरकरांकडून कौतुक


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -