घरमहाराष्ट्रव्हेल माशाच्या पिल्लाला जिवंत समुद्रात सोडण्यात यश; देशातील पहिले 'रेस्क्यु ऑपरेशन' ठरले

व्हेल माशाच्या पिल्लाला जिवंत समुद्रात सोडण्यात यश; देशातील पहिले ‘रेस्क्यु ऑपरेशन’ ठरले

Subscribe

रत्नागिरी : तब्बल 40 तासानंतर व्हेल माशाच्या पिल्लाला जिवंत समुद्रमध्ये सोडण्यात यश आले आहे. हे देशातील पहिले रेस्क्यु ऑपरेशन ठरले आहे. या व्हेल माशाच्या पिल्लाला मंगळवारी (14 नोव्हेंबर) रात्री उशिरा समुद्रात 4 ते 5 किलोमीटर आत सोडण्यात आले.

या व्हेल माशांच्या पिल्लू गणपतीपुळे सोमवारी (13 नोव्हेंबर) सकाळी 6.30 वाजताच्या सुमारास समुद्रकिनारी आले होते. यानंतर त्यादिवशीच व्हेल माशांच्या पिल्लाला तीन वेळा समुद्रात सोडले गेले होते. यानंतरही पुन्हा एकदा 14 नोव्हेंबर सकाळी हे पिल्लू समुद्रकिनारी दिसले. मग कोस्टगार्ड यांच्यासह सर्व विभागातीने व्हेल माशांच्या पिल्लाला पुन्हा समुद्रात सोडण्यासाठी ‘ऑपरेशन व्हेल’ सुरू केले. यानंतर मंगळवारी रात्री 11 वाजताच्या सुमारास व्हेल माशांच्या पिल्लाला समुद्र किनारी सोडण्यात यश आले. समुद्रात 4 ते 5 किलोमीटर आत सोडण्यात आले.

- Advertisement -

हेही वाचा – मुंबईच्या माजी पोलीस आयुक्तांना उच्च न्यायालयाकडून दिलासा; ‘ही’ याचिका फेटाळली

व्हेल माशाच्या पिल्लाचे ऐवढे आहे वजन

या व्हेल माशाच्या पिल्लाचे वजन पाच टन असून 20 फूट लांब होते. व्हेल माशाचे पिल्लू समुद्र किनारी आल्यानंतर पर्यटक, ग्रामस्थ, तज्ज्ञ, एमटीडीसीचे अधिकारी आणि वनविभागाचे अधिकाऱ्यांच्या प्रयत्नानंतर त्याला समुद्रात सोडण्यात यश आले. या ‘ऑपरेशन व्हेल’ रेस्क्यू ऑपरेशनसाठी तब्बल 40 तास प्रयत्न सुरू होते. पण अखेर व्हेल माशाचे पिल्लू सखरूपपणे समुद्रात गेले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -