अशा माणसाला राज्यपाल पदावर ठेवू नये; भगतसिंग कोश्यारींविरोधात शिंदे गट आक्रमक

ह्या राज्यपालांना कुठे पाठवायचे आहे. तिथे पाठवा असे आमदार संजय गायकवाड म्हणाले.c

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत जे वक्तव्य केले. त्यामुळे सर्वत्र संताप दिसत आहे अशातच आता नव्या वादाला तोंड फुटले आहे तर राज्यपालांनी माफी मागावी अशी मागणी सुद्धा होत आहे. अशातच आता शिंदे गटाने सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे.

दरम्यान राज्यपालांना कुठेही न्या. पण हे राज्यपाल महाराष्ट्रात नको अशी मागणी शिंदे गटातील आमदारांकडून
करण्यात येत आहे. तसेच महाराष्ट्राला समजून घेणारे राज्यपालच आम्हाला हवे आहेत असे शिंदे गटातील आमदार म्हणत आहेत.

शिंदे गटाचे आमदार नेमके काय म्हणाले?
शिंदे गटातील बुलडाण्याचे आमदार संजय गायकवाड यांच्या कडून ही मागणी करण्यात येत आहे. माध्यमांशी बोलत असताना त्यांनी भाजपाला ही विनंती केली आहे. ज्या राज्यपालांना आपला इतिहास माहित नाही. ज्याला राज्याचे राज्य काय आहे हे कळत नाही. अशा माणसाला आपल्या राज्याच्या पदावर ठेवू नये. यासाठी महाराष्ट्राच्या मातीतलाच मराठी माणूस राज्यपाल या वादावर असायला हवा. ह्या राज्यपालांना कुठे पाठवायचे आहे. तिथे पाठवा असे आमदार संजय गायकवाड म्हणाले.

राज्यपाल कोश्यारी काय म्हणाले?
कोणाला सुभाष चंद्र, कोणाला नेहरु, कोणाला गांधीजी चांगले वाटतात. ज्याला जी व्यक्ती चांगली वाटत असेल तो त्या व्यक्तीचे नाव घेत असत. आज तुम्हाला आदर्श शोधायचे असतील तर इतर कुठे बाहेर जाण्याची अजिबात गरज नाही.

तुम्ही महाराष्ट्रातच आपले आदर्श शोधू शकता. जर तुम्हाल कोणी विचारले तुमचे हिरो कोण आहेत तर मला वाटते तुम्हाला ते इथेच सापडतील. शिवाजी तर जुन्या काळातले आदर्श आहेत. मी नव्या युगाविषयी बोलतोय. डॉक्टर आंबेडकरांपासून डॉ. नितीन गडकरींपर्यंत सगळे तुम्हाला इथेच मिळतील, असे कोश्यारी म्हणाले. त्यामुळे राज्यपाल कोश्यारी यांच्या विरुद्ध संतापाची लाट उसळली आहे.


हा ही वाचा –  शिवरायांविरोधातील राज्यपालांच्या वक्तव्यावरून राष्ट्रवादी आक्रमक, धोतर फेडण्याचे अनोखे आंदोलन