Sunday, June 11, 2023
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र पुणे असल्या आलतू फालतू...; नरेश म्हस्केंच्या आरोपांवर अजित पवारांनी दिले उत्तर

असल्या आलतू फालतू…; नरेश म्हस्केंच्या आरोपांवर अजित पवारांनी दिले उत्तर

Subscribe

पुणे : शिवसेना नेते आणि ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्के (Naresh Mhaske) यांनी रोहित पवार (Rohit Pawar) यांना महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन निवडणुकीमध्ये पाडण्यासाठी अजित पवार (Ajit Pawar) यांनी अनेकांना फोन केल्याचा खळबळजनक आरोप केला होता. म्हस्के यांच्या आरोपांना विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी उत्तर देताना वक्तव्य केले की, आलतू फालतू स्टेटमेंट करणाऱ्यांना मी महत्त्व देत नाही.

माध्यमांशी बोलताना अजित पवारांनी सांगितले की, कोण नरेश म्हस्के मी त्यांना ओळखत नाही. असले आलतू फालतू आरोप करणाऱ्या लोकांना मी महत्त्व देत नाही आणि त्यांनी केलेल्या आरोपानुसार आम्ही घरामध्ये अशा पद्धतीने कधीच वागत नाही, असे अजित पवार म्हणाले. त्यांनी सांगितले की, माझी भूमिका स्पष्ट असते, त्यामुळे अशी घटना माझ्याकडून कधीच घडणार नाही. तो माझा पुतण्या आहे आणि माझा मुलासारखा आहे. अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली.

- Advertisement -

हेही वाचा – मविआची सभा होऊ नये म्हणून छत्रपती संभाजीनगरमध्ये कारस्थान, संजय राऊतांचा आरोप

नरेश म्हस्के यांनी काय केले आरोप?
रोहित पवार यांना महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन निवडणुकीमध्ये पाडण्यासाठी अजित पवार अनेकांना फोन करत असल्याचा खळबळजनक दावा शिवसेनेचे नेते आणि ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्के यांनी केला होता. याशिवाय त्यांनी असेही म्हटले की, तुम्ही आधी तुमच्या घरातले पाहा नंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आरोप करा.

- Advertisement -

हेही वाचा – संजय राऊत मूर्ख आणि मविआची सभा कॉमेडी शो; संजय शिरसाटांचे टीकास्त्र

रोहित पवार महाराष्ट्र क्रिकेट असोशिएशनेच सदस्य
महाराष्ट्र क्रिकेट असोशिएशनसाठी जानेवारीमध्ये पार पडलेल्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांची सदस्य म्हणून निवड झाली आहे. या निवडीसोबत रोहित पवार महाराष्ट्र क्रिकेट असोशिएशनच्या १६ सदस्याच्या कमिटीमध्ये सहभागी झाले आहेत. रोहित पवार यांना जिंकवून देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीसुद्धा कंबर कसली होती. त्यांनी या निवडणुकीसाठी भाजपच्या आशिष शेलार यांच्याशी युती केली होती.

- Advertisment -