अशा छोट्या-मोठ्या घटना होत राहतात, शिंदेंच्या बंडखोरीवर भुजबळांची प्रतिक्रिया

Chhagan Bhujbal

पक्षांतर्गत अनेक तक्रारी असतात. हे तर तीन पक्षांचं सरकार आहे. त्यामुळे सरकारमध्ये छोट्या-मोठ्या तक्रारी असतात. त्यामुळे अशा छोट्या-मोठ्या घटना घडत राहतात, अशी प्रतिक्रिया राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये आज राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला छगन भुजबळ उपस्थित राहिले असून त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. (Such small and big incidents keep happening, Bhujbal’s reaction to Shinde’s rebellion)

हेही वाचा – ज्यांनी आमदार केलं त्यांच्याशी गद्दारी नाहीच, सूरत सुटकेची कैलास पाटलांनी सांगितली आपबिती

राष्ट्रवादीच्या नेत्यांनाही भाजपसोबत जायची इच्छा आहे का असा प्रश्न विचारला असता, ते म्हणाले की, राष्ट्रवादीच्या कोणत्याच नेत्याला भाजपसोबत जाण्याची इच्छा नाही. राष्ट्रवादीचे सर्व आमदार मजबुतीने एकत्र उभे आहेत. पक्षांतर्गत अनेक तक्रारी येत असतात. त्यामुळे सरकारमध्येही लहान-मोठ्या कुरबुरी असतात. पण त्याकडे फार लक्ष द्यायची गरज नाही. हे प्रकरण फार लहान आहे, असंही छगन भुजबळ म्हणाले.

आणखी वाचा

संजय राऊत यांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचं वक्तव्य केलं होतं. त्यावर प्रश्न विचारला असता छगन भुजबळ म्हणाले की, शिवसेनेला महाविकास आघाडीतून बाहेर पडायचं असेल त्यांनी महाविकास आघाडीतील पक्षांशी तशी चर्चा करावी. उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना विश्वासा घेऊन चर्चा करावी, मग निर्णय घ्यायला सोपे जाईल, असं छगन भुजबळ म्हणाले.

संजय राऊत यांनी असं विधान करण्यापूर्वी महाविकास आघाडीतील इतर महत्त्वाच्या नेत्यांशी चर्चा करायला हवी होती त्यांच्या अडचणी त्यांचे काय म्हणने आहे ते विश्वासात घेऊन सांगायला पाहिजे होते, असं छगन भुजबळ म्हणाले.

शिवसेना स्वतंत्र पक्ष आहे. त्यांचा निर्णय घेण्यासाठी ते स्वतंत्र आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आवाहन केले आहे, ते मला माहिती आहे. कोणत्याही पक्षाला सरकारमध्ये राहायचे की नाही हा त्यांचा प्रश्न आहे तस त्यांनी समोर येऊन सांगावे, असं भुजबळ म्हणाले.

महाविकास आघाडी सरकारला काही झाले तरी राष्ट्रवादी पक्ष काळजी करत नाही कारण विरोधी पक्षात राहून जनतेची सेवा करण्याची सवय राष्ट्रवादी पक्षाला आहे.

त्यामुळे आमच्यासाठी ते काही नवीन नाही. सत्ता येते आणि जाते. त्यामुळे त्यांना जे काही सांगायचे आहे तर त्यांनी पवारांना सांगावे आमची तशी तयारी आहे, असं स्पष्टीकरण छगन भुजबळांनी दिलं आहे.

हेही वाचा