घरताज्या घडामोडीसागर परिक्रमेसाठी महाराष्ट्र संपूर्ण शक्तीनिशी प्रयत्न करणार, सुधीर मुनगंटीवारांची केंद्रीय मंत्र्यांना ग्वाही

सागर परिक्रमेसाठी महाराष्ट्र संपूर्ण शक्तीनिशी प्रयत्न करणार, सुधीर मुनगंटीवारांची केंद्रीय मंत्र्यांना ग्वाही

Subscribe

नवी दिल्ली : केंद्रीय सागर परिक्रमा योजनेंतर्गत महाराष्ट्राला लाभलेला 720 किलोमीटरच्या सागरीभागाची (किनारा) परिक्रमा करून येथील मासेमारांशी थेट संपर्क करून समस्या जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र संपूर्ण सहकार्य करेल, असे आश्वासन राज्याचे मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्री पुरूषोत्तम रूपाला यांना आज येथे दिले.

केंद्रीय मंत्री पुरूषोत्तम रूपाला यांच्या अध्यक्षतेत सागर परिक्रमा टप्पा 3 च्या आढावा बैठकीचे आयोजन गरवी गुजरात भवन येथे करण्यात आले. या बैठकीस केंद्रीय मत्स्यव्यवसाय राज्य मंत्री संजीव बालियान, राज्याचे मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार, खासदार विनायक राऊत, आमदार सुनील राणे, मासेमारी संघटनेचे अध्यक्ष तुकाराम वानखेडे, मत्स्यव्यवसाय विभागाचे प्रधान सचिव तथा मत्स्यव्यवसाय आयुक्त डॉ. अतुल पाटने, यांच्यासह केंद्र शासनातील मत्स्यव्यवसाय विभागाचे सचिव तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

- Advertisement -

भारताला एकूण 8 हजार किलो मिटरचा सागरी किनारा लाभला आहे. यंदाचे वर्ष अमृत महोत्सवी वर्ष असून या वर्षात सागरी भागातील मासेमारीशी निगडित समस्या, अडचणी जाणून घेण्यासाठी केंद्र शासनाच्या मत्स्यव्यवसाय मंत्रालयाने सागर परिक्रमा हा प्रकल्प सुरू केला आहे. या अंतर्गत सागरी मार्गातून पर‍िक्रमा करून प्रत्यक्ष मासेमारी करणा-यांना भेडसावणारे प्रश्नाना समजून घेण्याचा प्रयत्न असल्याचे केंद्रीय मंत्री रूपाला यांनी यावेळी सांगितले. यातंर्गत गुजरात राज्याची परिक्रमा पूर्ण झालेली आहे. पुढचा 3 आणि 4 टप्पा महाराष्ट्राचा आहे. सागरी पर‍िक्रमेच्या माध्यमातून मासेमारी करणा-यांना केंद्र शासनाच्या योजनेचा अधिकाधिक लाभ मिळावा, असे मानस असल्याचेही रूपाला म्हणाले.

सागर परीक्रमा या उपक्रमाचे कौतूक करीत मुनगंटीवार म्हणाले की, केंद्र शासनाकडे मत्स्यव्यवसायाशी संबंधित अद्यावत तंत्रज्ञानाची माहिती राज्यांनाही देण्यात यावी तसेच अशा तंत्रज्ञानाचे उपकेंद्र राज्यात स्थापित करावे. यासह पांरपारिक मासेमारांसाठी आणि तंत्रज्ञानाच्या सहायाने मासेमारी करणा-यांसाठी देशभर समान नियमावली असावी. सध्या यात तफावत दिसत असल्याचे त्यांनी केंद्रीय मंत्र्यांच्या निर्दशानास आणून दिले.

- Advertisement -

ज्या राज्यांमध्ये मासेमारी मोठया प्रमाणात केली जाते, अशा राज्यांची दोन दिवसीय परीषेदेचे आयोजन केंद्राने करावे, अशी विनंती मुनगंटीवार यांनी यावेळी केली. महाराष्ट्रातील 7 जिल्ह्यांना लागून सागरी किनारा आहे. परंतु राज्यात अंर्तदेशीय मासेमारीही मोठया प्रमाणात केली जाते. तसेच मासेमारी विक्रीच्या कामात हजारो लोक गुंतले आहेत. माश्यांची साठवणूक, विक्री संदर्भातील तसेच अन्य अडचणी आहेत. सार्वजनिक खाजगी भागीदारीतून मॉडेल तयार करून याचा लाभ मासेमारी व्यवसायातील लोकांना वर्षभर होईल, अशी योजना केंद्रीय स्तरावर असावी, अशी अपेक्षा मुनगंटीवार यांनी यावेळी व्यक्त केली.

यासह किसान क्रेडीट कार्ड, मासेमारांसाठी पायाभूत विकास, जुन्या जेट्टींचे निराकरण, अशा महत्वपूर्ण विषयांवर आजच्या बैठकीत चर्चा झाली. केंद्रीय मंत्री रूपाला यांचा महाराष्ट्रातील सागर परिक्रमा अंतर्गत टप्पा-3 आणि 4 मध्ये अधिकाध‍िक मासेमारांशी थेट संपर्क होईल, असे नियोजन केले जाईल, असे आश्वासन मुनगंटीवार यांनी यावेळी बैठकीत दिले.


हेही वाचा : …तर जनता रस्त्यावर उतरून तुमचे थोबाड फोडेल; राऊतांचा केशव उपाध्येंना इशारा


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -