सामना वृत्तपत्र नसून एका पक्षाचे पॅम्प्लेट, सुधीर मुनगंटीवारांचा हल्लाबोल

Sudhir Mungantiwar's attack Samana is not a newspaper it is pamphlet of a shivsena party

भाजपने देशात अनेक ठिकाणी ईडी, सीबीआय आणि इतर केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करुन अनेक राज्यातील राजकीय परिस्थिती ढळमळीत करणाऱ्या भाजपच्या ऑपरेशन लोटस म्हणून जे चालवले जाते, त्यामुळे विष्णूचे आवडते फूल बदनाम झाले असल्याची जळजळीत टीका आज सामनातून भाजपवर करण्यात आली आहे. याच टीकेला आता राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे. सामना वृत्तपत्र नसून एका पक्षाचे पॅम्प्लेट असल्याचे म्हणत सुधीर मुनगंटीवार यांनी शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे.

सामना वर्तमान पत्र नसून एका पक्षाचे पॅम्प्लेट आहे. त्या पॅम्प्लेटमध्ये जनतेचे प्रश्न जनतेचे प्रश्न, समस्या, कष्टकऱ्यांच्या समस्या सोडवण्याऐवजी फक्त आणि फक्त त्या वर्तमान पत्राचा उपयोग राजकीय टीका करण्यासाठी होतो. गेल्या दोन वर्षात जनतेचे प्रश्न सोडवण्यात या वर्तमान पत्र अर्थात पॅम्प्लेटचा उपयोग झाला नाही. अशी जहरी टीका आज मंत्री मुनगंटीवार यांनी केली आहे.

सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, अतिवृष्टीने ज्यांचे नुकसान झाले त्या सर्वांना मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्यांदाच या राज्यात मदत करण्याचे धोरण घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चंद्रपूर, गडचिरोली आणि महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमध्ये स्पष्ट आदेश दिले की, कोणीही मदतीपासून वंचित राहू नये. अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त 75 वर्षे पूर्ण झालेल्या नागरिकांना एसटी बसेस आणि सेवांमध्ये १०० टक्के सवलतीच्या दरात प्रवास करण्याचा निर्णय घेतला आहे.

या अधिवेशनात विविध विषयांवर विरोधकांना अतिशय असफल प्रयत्न करुन सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. पण सरकारनेच विरोधकांच्या प्रत्येक प्रश्नावर उत्तर देत जनतेला सरकारने न्या देण्याची भूमिका बजावली आहे. असही मुनगंटीवार म्हणाले.


मराठा आरक्षण निवडसूचीतील 1 हजार 64 उमेदवारांची तात्काळ नियुक्ती; मुख्यमंत्र्यांचे आश्वासन