Tuesday, September 28, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी ठाकरे सरकार डबल कुंभकर्णाची झोप काढणारे, ओबीसी आरक्षणावरुन मुनगंटीवार यांची टीका

ठाकरे सरकार डबल कुंभकर्णाची झोप काढणारे, ओबीसी आरक्षणावरुन मुनगंटीवार यांची टीका

मागासवर्ग आयोगाची स्थापना करण्यासाठी राज्य सरकारला २ वर्षाचा कालावधी का लागला?

Related Story

- Advertisement -

ओबीसी आरक्षणाचा मुद्द्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर तोफ डागली आहे. भाजपच्या इतर नेत्यांनीही ओबीसी आरक्षणावरुन आक्रमक भूमिका घेतली आहे. ओबीसी आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागल्याशिवाय निवडणूका होऊ देणार नाही असा पवित्राच भाजप नेत्यांनी घेतला आहे. राज्यसरकारविरोधात ओबीसी आरक्षणासाठी भाजपने २६ जूनला चक्काजाम राजव्यापी आंदोलनाची घोषणा केली आहे. या आंदोलनात महाविकास आघाडी सरकार जळून जाईल असं वक्तव्य भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केलं आहे. ठाकरे सरकार हे डबल कुंभकर्णाची झोपा काढणारे सरकार असल्याचेही मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे.

राज्यातील महाविकास आघाडी सरकार हे मागील २ वर्षांपासून कोमात असल्याप्रमाणे काम करत आहे. राज्य सरकार ओबीसी आरक्षण टिकवण्यामध्ये अपयशी ठरले आहे. हे कुंभकर्णी सरकार आहे. कुंभकर्ण ६ महिने झोपा काढायचा मात्र हे सरकार त्यापेक्षा डबल महिने झोपा काढतंय असा टोला मुनगंटीवार यांनी लगावला आहे. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्याती जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या पोटनिवडणूका घेऊ नये यासाठी चक्काजाम आंदोलन २६ जूनला करण्यात येणार आहे.

- Advertisement -

राज्य सरकार इम्पेरिकल डेटासाठी केंद्र सरकारकडे बोट दाखवत होते. मागासवर्ग आयोगाची स्थापना करण्यासाठी राज्य सरकारला २ वर्षाचा कालावधी का लागला? असा सावल मुनगंटीवार यांनी केला आहे. तसेच ठाकरे सरकारचे पितळ उघडे पडण्याची भीती आहे. यामुळे दोन दिवसांचे पावसाळी अधिवेशन ठेवण्यात आल्याची टीका सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे.

ओबीसी आरक्षणावरुन फडणवीस आक्रमक

विरोधी पक्षनेते देवेद्र फडणवीस यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली आहे. फडणवीसांनी राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या पोटनिवडणूका होऊ देणार नाही असे वक्तव्य केलं आहे. ओबीसी आरक्षणाचा मुद्दा मार्गी लागल्याशिवाय राज्यातील निवडणूका होऊ देणार नाही असा घणाघात फडणवीस यानी केला आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे फडणवीस यांनी निवडणुका पुढे ढकलण्याबाबत मागणी केली आहे. सरकार निवडणुका घेण्यावर ठाम असल्यास भाजप सर्व जागांवर ओबीसी उमेदवार उभे करेल मग या निवडणूकांमध्ये हरलो आणि जिंकलो तरी आम्हाला पर्वा नाही अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

- Advertisement -