गृहमंत्र्यांवर जर दबाव असेल तर त्यांनी गृहमंत्री पद फेकून द्यावं – सुधीर मुनगंटीवार

bjp leader sudhir mungantiwar slams congress leader nana patole over maharashtra political crisis

महाराष्ट्र पोलीस दलातील काल काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदली आणि पदोन्नतीचे आदेश काढण्यात आले होते. मात्र, पत्रक काढून १२ तास उलटत नाही तोच पाच अधिकाऱ्यांच्या बदलीच्या आदेशाला स्थगिती देण्यात आली. अवघ्या काही तासात पोलीस पदोन्नती आदेशाला स्थगिती दिल्यामुळे गृहखात्याच्या कारभाराबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. भाजपने यावरून आता महाविकास आघाडीवर टीका केली आहे. गृहमंत्र्यांवर जर दबाव असेल तर त्यांनी गृहमंत्री पद फेकून द्यावं, अशी टीका भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे.

गृहमंत्र्यांवर जर दबाव असेल तर त्यांनी गृहमंत्री पद फेकून द्यावं

सुधीर मुनगंटीवार यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये चार महिन्यांत ज्या आयुक्तावर आरोप होते. त्यांना चार महिन्यात पाठवलं. कोणत्या कायद्यासंदर्भात तुम्ही पाठवत आहात. तुम्ही काहीही कराल आणि तुमच्या मनाने पोलीस अधिकारी दिले नाहीत. तसेच चांगले पोलीस अधिकारी या भागात आले. तर आपण अडचणीत येऊ या भावनेने हे काम होत असेल तर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी गृहमंत्री पद फेकून द्यावं, असा घणाघात मुनगंटीवार यांनी केला आहे.

राज्यात वळसे पाटलांच्या रुपात एक नामधारी गृहमंत्री आहे, ज्यांचं कोणी ऐकत नाही. कुणीही उठतं आणि त्यांच्याविषयी नाराजी व्यक्त करतं. काही कार्यकारी गृहमंत्री आहेत. ज्यांचे व्हिडीओ रेकॉर्ड आपण बघितलेत, जे फोनवर आदेश देतात, असं मुनगंटीवार म्हणाले.

एकनाथ शिंदे नगरविकासच्या बदल्या कोणत्या आमदारांना विचारून करतात

नापसंती आणि पसंती असा काही प्रश्नच उपस्थित होत नाही. नियमाच्या चौकटीत राहून सुप्रीम कोर्टाने पोलीस विभागाच्या बदल्या कशा कराव्यात, यासाठी काही निर्देश दिले आहेत. या निर्देशानुसार पोलीस महासंचालकांचा अधिकार आहे. राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचा अधिकार नाही. एकनाथ शिंदे हे नगरविकासच्या बदल्या करतात ते कोणत्या आमदारांना विचारून करतात, असा सवाल मुनगंटीवार यांनी विचारला.


हेही वाचा : गृहखात्याचा अजब कारभार, पाच अधिकाऱ्यांच्या बदल्यांना अवघ्या १२ तासांत स्थगिती